विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मराठवाडा, पश्चिम विदर्भ, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात तर अक्षरशः ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच अधिकारी वर्गाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.CM Fadnavis
अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे, विशेषतः मराठवाड्यात सर्वाधिक फटका बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे.CM Fadnavis
मुख्यमंत्री फडणवीसांची सोशल मीडिया पोस्ट काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे 8 जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचनाही केल्या. मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
काही जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत. पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुद्धा त्यांनी सांगितले आहे. सर्व अधिकार्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावे, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
सरसकट पंचनामे करण्याचे आदेश
लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे. सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कायद्यावर आणि नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असे कोणीही वागू नका, असेही निर्देश देण्यात आले आहेत. सगळ्या नुकसानीची माहिती आमच्याकडे आल्यानंतर अधिकची काय मदर करायची, त्याचा निर्णय सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App