विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा कानमंत्र दिला आहे. पालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या वाटाघाटी वेळी पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी या मेळाव्यात व्यक्त केला.Eknath Shinde
युतीची चिंता करू नका, त्यांची गणिते आपल्याकडे
मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. कोण कोणाशी युती करतंय त्याची चिंता करू नका. त्यांची सर्व गणितं आपल्यापकडे आहेत, असे ते म्हणाले. पालिका निवडणूक जिंकण्याच्या निश्चयाने दसरा मेळाव्यात गर्दी करा, असे आवाहनही शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.Eknath Shinde
विचार, विकास आणि विश्वास या त्रिसूत्रानुसार कामाला लागा
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना महत्त्वाच्या सूचना दिल्या. जागावाटप करताना पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘विचार, विकास आणि विश्वास’ या त्रिसूत्रानुसार कामाला लागून मुंबई महापालिका जिंकण्याचा उद्देश ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. महापालिका निवडणुकीची कमान शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांवर असेल, त्यामुळे नेमणुका बाकी असल्यास त्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पूर भागात मंत्र्यांचे दौरे झाले. आता खासदार, आमदार, पदाधिकारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर जातील. संकट दिसले की मदतीला धावून जा, तो खरा शिवसैनिक. निमंत्रणाची वाट बघू नका. हा पक्ष नोकर आणि मालकाचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्याचा आह. शिस्त ही शिस्त आहे. ‘शिवसेना’या अक्षरांना गालबोट लागता कामा नये.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App