विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्हाधिकार्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत पुराच्या स्थितीतून 4002 लोकांना वाचविण्यात आले असून, 6500 लोक हे मदत शिबिरांमध्ये आहेत. तेथे भोजन, पाणी आणि आरोग्याच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. जेथे गावांमध्येही भोजन पुरविण्याची गरज आहे, तेथे अक्षयपात्रा फाऊंडेशनचे सहकार्य प्रशासनाला होते आहे. Solapur
गावांमध्ये चार्याच्या समस्या पाहता चारापुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले असून, उद्यापासून ही व्यवस्था अधिक क्षमतेने कार्यान्वित होईल.
नुकसान झालेल्या घरांच्या पंचनाम्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहूसह तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये दिले जात आहेत. नाम फाऊंडेशन सुद्धा प्रशासनाला सहकार्य करते आहे. जिल्ह्यातील उद्योजक, मान्यवर अशा मंडळींना एकत्र करुन प्रशासनाने समन्वयातून काही नियोजन केले आहे. जिल्हास्तरिय आणि तालुकास्तरिय मदत कक्ष अशी रचना करण्यात येत आहे.
उद्यापासून मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरांचेही नियोजन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
बीड जिल्ह्यातली 17 धरणे 100 % भरली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीडच्या जिल्हाधिकार्यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील 17 धरणे 100 % भरली असून, 2 धरणे ही 90 टक्क्यांच्या आसपास आहे. केवळ माजलगावमधून विसर्ग करण्यात येत आहे.
वडवणी तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे. तेथे आवश्यक ती मदत पुरविली जात आहे. एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे पथक बीडमध्ये सज्ज असून, ते बचावकार्य करीत आहेत. सुमारे 48 मंडळात काल अतिवृष्टी झाली आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, परिस्थिती उदभवल्यास त्यांना स्थानांतरित करण्यात येईल. आष्टीमधून 60 नागरिकांना सुरक्षित हलविण्यात आले आहे. – सप्टेंबरपासून 2567 कुटुंबांना सुरक्षित स्थलांतरित करावे लागले. 10 लोकांना प्राण गमवावे लागले. त्यापैकी 8 कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App