विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतासारख्या हिंदूराष्ट्रात I love Mahadev हेच उद्गार चालणार, अशा शब्दांमध्ये राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी एल्गार केला. Nitesh Rane
सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून या 150 दिवसाच्या कार्यक्रमात चांगलं काम, प्रगती दिसली पाहिजे. म्हणून एक आढावा बैठक आयोजित केली होती. सगळे खातेप्रमुख चांगलं काम आणि गतीमान काम करत आहेत. काही त्रुटी आहेत पण अजून सहा दिवस आहेत. सातत्याने आढावा घेतला जाईल. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना जिल्हा पातळीवर जे काम अपेक्षित आहे, ते सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आम्ही निश्चित पूर्ण करु. हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत” असं नितेश राणे म्हणाले.
– I love Mahadev
नितेश राणे यांनी आय लव्ह महादेवची पोस्ट केली होती. त्यावर सुद्धा ते बोलले. “ही भूमी महादेवाची आहे. आपल्या प्रत्येकाच्या श्वासात महादेव आहेत. हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेव लिहिणार नाही तर अजून काय लिहिणार? एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर महादेव, एम फॉर मुंबई सरळ स्पष्ट आहे, आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेव चालणार. मी पाकिस्तान, इस्लामाबाद, कराचीमध्ये बसून आय लव्ह महादेव लिहिलेलं नाही. मी आमच्या भारतात हिंदू राष्ट्रात, हिंदुत्ववादी विचारांच्या महाराष्ट्रात बसून आय लव्ह महादेव लिहिलय. त्यात काही चुकीचं नाही” असं नितेश राणे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा आणि ओल्या दुष्काळासंदर्भात नितेश राणेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर “दोन दिवस मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला. प्रत्येकाच्या अडचणी समजून घेतल्या. काही निकषांचा विषय असतो, काही निधी संदर्भात विषय असतो. केंद्रात आणि राज्यात आम्ही डबल इंजिन सरकार बोलतो, त्याचा हाच फायदा असतो. केंद्र, राज्यात एका विचाराच सरकार असतं, तेव्हा राज्य हक्काने केंद्राकडे जाऊ शकतं. आतापर्यंत नरेंद्र मोदी साहेब, अमित शाहसाहेब एकंदरीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खालीहाथ पाठवलेलं नाही. या संकट काळात नरेंद्र मोदी भरभरुन मदत करतील महाराष्ट्राला विश्वास आहे” असं नितेश राणे म्हणाले.
जेवढी मदत होऊ शकते तेवढी केली पाहिजे
उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावर नितेश राणे म्हणाले की, “प्रत्येकाला आपल्या पद्धतीने संकटकाळात जनतेसाठी उभं राहण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रातला तो भाग संकटात आहे. म्हणून जेवढी मदत होऊ शकते तेवढी केली पाहिजे”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App