I love Mohammad वादावरून बरेलीमध्ये मौलाना तौकिर रझाच्या समर्थकांची दगडफेक; पोलिसांनी लाठीचार्ज करून आणले वठणीवर

विशेष प्रतिनिधी

बरेली : I love Mohammad वादातून उत्तर प्रदेशातल्या बरेलीत मौलाना तौकिर रझाच्या समर्थकांनी दगडफेक करून तीन ठिकाणी दंगल माजवली. पण योगींच्या पोलिसांनी लाठीचार्ज करून दंगलखोरांना अद्दल घडवली.

मौलाना तौकिर रझाच्या समर्थकांनी शुक्रवारी “आय लव्ह मोहम्मद” वादावरून बरेलीमध्ये तीन ठिकाणी दंगली केल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. दंगलखोरांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ठोकून काढले.

मौलाना तौकीर रझा यांनी मुस्लिमांना शहरातील इस्लामिया मैदानावर निषेध करण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारच्या नमाजानंतर जमाव रस्त्यावर उतरला आणि जबरदस्तीने मैदानात प्रवेश करण्याचा आग्रह धरला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाला थांबवण्यात आले. त्यानंतर, जमावाने तोडफोड करण्यास सुरुवात केली, धार्मिक घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि हिंसक बनले. त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली, अगदी छतावरून दगडफेक देखील केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.



बारादरी आणि प्रेमनगर भागातही अशांतता होती. पोलिसांनी शहरातील बाजारपेठा बंद केल्या. सध्या पोलिसांनी इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल (आयएमसी) चे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांना ताब्यात घेतले आहे. २०१० मध्ये बरेलीमध्ये दंगल भडकवल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. हा खटला सध्या न्यायालयात आहे.

– आय लव्ह मोहम्मद वादाची सुरुवात कानपूरात

हा वाद उत्तर प्रदेशातील कानपूर येथून सुरू झाला. बरवाफत (ईद मिलाद-उन-नबी) मिरवणुकीदरम्यान, एका गटाने मिरवणुकीच्या मार्गावर “आय लव्ह मोहम्मद” असे लिहिलेले बॅनर/लाईटबोर्ड लावले. स्थानिक हिंदू संघटनांनी निषेध केला.

पोलिसांनी बॅनर काढून टाकले आणि नऊ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. १५ अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. वाद आणखी वाढला, “आय लव्ह मोहम्मद” चे समर्थन करणारे रॅली, बॅनर आणि पोस्टर्स इतर अनेक शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये लावण्यात आले. हिंदू समुदायाने “आय लव्ह महादेव/महाकाल” असे बॅनर लावून प्रतिसाद दिला.

Maulana Tauqir Raza’s supporters pelt stones in Bareilly over ‘I love Mohammad’ controversy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात