विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना नेपाळ मधल्या Gen Z चे अचानक कौतुक वाटायला लागले. भारतात तशीच “क्रांती” घडवावीशी वाटली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या दाव्यातील हवा काढून टाकली.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या विषयापासून वोट चोरीच्या मुद्यावर रोखठोक उत्तर दिली. त्याचवेळी ते म्हणाले की, ‘ज्यांना नेपाळच्या Gen-Z वर प्रेम आहे, त्यांनी नेपाळला जाऊन राहिलं पाहिजे’ राहुल गांधी यांच्या Gen-Z च्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत आणि नेपाळची स्थिती वेगळी आहे. ज्यांना नेपाळवर भरपूर प्रेम आहे, त्यांनी नेपाळला राहिलं पाहिजे’ ते असं सुद्धा म्हणाले की, “भारताच्या युवकांकडे विरोध प्रदर्शनासाठी वेळ नाहीय. कारण ते स्टार्टअप्स, AI आणि आयटी सारख्या क्षेत्रात काम करतात” देवेंद्र फडणवीस इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये बोलत होते.“भारतीय युवक इंजिनिअर आहेत. जगभरात त्यांनी आपली ओळख बनवली आहे. ते तुम्हाला सिलिकॉन व्हॅलीमध्ये दिसतील. भारताच्या जनरेशन Z चा विचार वेगळा आहे. नेपाळ सारखा विचार करुन काम करत नाही.
– राहुल गांधी हाताश
आपल्या Gen-Z च्या नजरेत राहुल गांधी यांचं महत्व काय आहे? राहुल गांधीचे सर्व राजकीय उपाय करुन झालेत. त्यांना सगळीकडे अपयश आले त्यामुळे आता ते हताश आहेत. त्यांना असं वाटतं की, Gen-Z ना अपील करुन काही होऊ शकतं. पण आपल्या Gen-Z च्या नजरेत राहुल गांधी यांचं महत्व काय आहे? ते आपल्याला बोलायच नाही. भारताच्या युवकांकडे विरोध प्रदर्शनासाठी वेळ नाहीय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहुल गांधींनी काय आवाहन केलेलं?
नेपाळमधल्या प्रदर्शनानंतर राहुल गांधी यांनी देशातील विद्यार्थी आणि युवकांना 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या Gen-Z ना देशातील लोकाशाही वाचवण्यात आवाहन केलं होतं. देशातील मत चोरीच्या मुद्यावर रस्त्यावर उतरण्याच आवाहन केलं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत आणि नेपाळमध्ये ऐतिहासिक संबंध असल्याच मान्य केलं. पण दोन्ही शेजारी देश वेगवेगळे असल्याच सांगितलं.
फडणवीसांनी शेतकऱ्याला आधार दिला
महाराष्ट्रात सध्या भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि सोलापुरात शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं आहे. फक्त पावसामुळे पिक वाहून गेली नाहीत, तर माती सुद्धा वाहून गेली. जमीन खरवडून गेली आहे. शेतकऱ्यासमोर भविष्याच मोठं संकट आहे. काल देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष स्थितीची पाहणी केली. शेतकऱ्याला आधार दिला. शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीची घोषणा केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App