विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा देखील पुराच्या विळख्यात अडकला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. तसेच शेतांमध्ये पुराचे पाणी गेल्याने पिकांची नासाडी झाली असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. अशात आता सरकारने पुढाकार घेतला असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ देण्यात येत आहे.Maharashtra
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विभागाकडून बाधित कुटुंबाला धान्य वितरित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राज्यातील पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ वितरण करण्यास सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 2654 कुटुंबांना मदत केली आहे. साडे सव्वीस मेट्रिक टन गहू तांदूळ दिला आहे, आमच्या विभागाकडून अन्नधान्य पुरवठा केला जातो आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच केंद्राची मदत शंभर टक्के येईल. संकट एवढे मोठे आहे की मदतीची वाट न बघता बाधित लोकांना मदत करायला सरकार पुढे येईल. पंचनामा झाल्यानंतर किती मदत द्यावी हे स्पष्ट होईल, असेही भुजबळ म्हणाले.Maharashtra
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, पहिल्या टप्प्यात मदत केली आहे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. असा पाऊस यापूर्वी आम्ही बघितला नाही, असे अनेक लोक म्हणत आहेत. ढगफुटी अनेक ठिकाणी होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम दिसून येत आहेत. पाऊस पडत नाही तर कोसळतोय. त्यामुळे टाऊन प्लॅनिंग करताना विचार व्हायला हवा, असे भुजबळ म्हणाले.
मंत्री, खासदार व आमदार आपला एक महिन्याचा पगार देणार
सरकारकडून बाधित कुटुंबांना मदत तर मिळणार आहेच, पण त्याचसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या आमदार, खासदार व मंत्र्यांकडून मदत केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानुसार पक्षातील सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधान परिषदेचे आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवारांकडून पूरपरिस्थितीची पाहणी
दरम्यान, अजित पवारांनी आज पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत पूरग्रस्त भागात भेट दिली. सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांना त्यांनी भेट दिली व पूरपरिस्थितीची पाहणी केली. या भागातील पीडित नागरिकांशी त्यांनी संवाद साधला व सर्व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आणि आमदारांना आपापल्या भागात मदतीचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App