CM Fadnavis : अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; पंचनाम्यासाठी ड्रोन व मोबाईल फोटोंना मान्यता

CM Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Fadnavis महाराष्ट्रात गत काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अमाप नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळ आजपासून अतिवृष्टीग्रस्तांच्या भेटीसाठी राज्याच्या राजधानीबाहेर पडले आहे.CM Fadnavis

शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ते म्हणाले की, दुष्काळाच्या वेळी लागू होणारे नियम आता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी देखील वापरले जातील, जेणेकरून शेतकऱ्यांना मदत करणे सोपे होईल. नुकसानीचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्यावर भर असून, जिथे पारंपरिक पद्धतीने पंचनामे करणे शक्य नाही, तिथे ड्रोनचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, जर शेतकऱ्यांनी मोबाईलने फोटो काढून नुकसानीचा पुरावा दिला, तरी तो ग्राह्य धरला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या परिस्थितीत नियमांचा अडसर न आणता यंत्रणांनी लवचिक राहून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.CM Fadnavis



काळजी करू नका, शासन आपल्या सोबत -कृषिमंत्री

जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले आहे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेती शिवाराची आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. सोमठाणा, ता.बदनापूर, ढाकलगाव, ता. अंबड या गाव शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन “काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे” असा धीर दिला. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगतानाच तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

पंकजा मुंडे ट्रॅक्टरमधून पूरग्रस्तांच्या भेटीला

मंत्री पंकजा मुंडे यांनी आज ट्रॅक्टरमधून प्रवास करत जालन्यातील पूरग्रस्तांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, जालना जिल्ह्यातील गोळेगाव ता. परतूर या गोदाकाठी वसलेल्या गावाला नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. संपूर्ण गाव पुराच्या पाण्याने वेढले, शेतात पाणी साचले तसेच ग्रामस्थांना विस्थापित व्हावे लागले अशा परिस्थितीत गावात ट्रॅक्टरने जाऊन नुकसानीची पाहणी केली. आमदार बबनराव लोणीकर, राहूल लोणीकर, तसेच जिल्हाधिकारी सीईओ व सर्व अधिकारी यावेळी सोबत होते. गोळेगावच्या पूनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू असा शब्द दिला. नुकसानग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व इतर मदत तातडीने देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या.

सोलापूर-पुणे महामार्ग बंद, केवळ पायी पूल ओलांडण्याची परवानगी

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने माढा तालुक्यात मोठा पूर आला आहे. माढ्यातील, रिधोरे येथील आणि सोलापूर-पुणे महामार्गावरील पुलाच्या खालून मोठ्या प्रवाहाने पाणी वाहत आहेत. सीना नदीच्या पुराचा फटका रेल्वे आणि रस्ते प्रवासी वाहतुकीला बसला आहे. त्यानुसार, लातूर-मुंबई ही ट्रेन 3 तास उशिराने धावली, तर नांदेडहून 23 सप्टेंबर 2025 रोजी निघणारी व पनवेलहून 23 सप्टेंबर 2025 रोजी निघणारी नांदेड – पनवेल – नांदेड एक्सप्रेस बार्शीमार्गे न जाता अहिल्यानगर मार्गे धावली.

दुसरीकडे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग काल रात्री 11 वाजेपासून प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशी खोळंबले होते. पण आता पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना पोलिसांनी पायी पूल ओलांडण्याची परवानगी दिली आहे. हा पूल बंद असल्यामुळे या मार्गावर वाहनांच्या 3-4 किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या होत्या.

राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार-खासदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे आहे. आमचा पक्ष याविषयी आणखी काही मदत योजनांची घोषणा करेल. पक्षाच्या या एकत्रित उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी खंबीरपणे उभा आहे, असे तटकरे म्हणाले.

CM Fadnavis Gives Instructions For Rain-Affected People

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात