विशेष प्रतिनिधी
धाराशिव :Manoj Jarange अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण मंत्रिमंडळ पाहणी दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राजकारण सुरू केले आहे. सरकारने निकष न लावत जेवढे नुकसान झाले आहे, तेवढी मदत द्यावी. अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.Manoj Jarange
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पावसामुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील चिंचपुर ढगे व पिंपळगाव येथे भेट दिली. पिंपळगाव येथील आत्माराम दातखिळे यांना धीर देताना म्हटले की, शेतमालाचे नुकसान, जनावरांचे मृत्यू, घरांचे झालेले नुकसान या साऱ्या गोष्टी गंभीर आहेत.Manoj Jarange
सरकारने तात्काळ मदतकार्य सुरू करून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करताना 50 टक्के, 60 टक्के असे करू नका, असे आवाहन जरांगे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना केले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे देखील जरांगे यांनी सांगितले.
पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभे पीक आडवे झाले आहे, तर काही ठिकाणी तर पिकांचा अक्षरशः चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांच्या शेतांमध्ये तर कमरेएवढे पाणी साचले असून शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे सरकारकडून तातडीने मदतीची याचना शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App