मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री अतिवृष्टीग्रस्त भागात दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मंत्री संजय शिरसाट आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आज संपूर्ण राज्याचा दौरा करत असून ते अतिवृष्टीग्रस्त भागात दौऱ्यावर गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत अजित पवारांनी सोलापूर मार्गे बीड चा दौरा सुरू केला आहे त्याचबरोबर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना जिल्ह्याचा दौरा केला. संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केला.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच अन्य मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. शरद पवार यांच्यासह सगळ्या विरोधी नेत्यांनी मुंबई किंवा अन्य शहरांमध्ये बसून महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली उद्धव ठाकरेंनी मुंबईत बसून शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये मदत द्या, अशी मागणी केली.

परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने विरोधकांना कुठलाही शब्द न देता हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करणे पसंत केले. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वात अधिक अतिवृष्टी झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले. अजित पवारांना बीडच्या दौऱ्यावर पाठविले. या सगळ्यांनी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत नेमके नुकसान किती कुठल्या पद्धतीचे आणि कसे झाले याचा नीट आढावा घेतला. या सगळ्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांनी आपल्या समस्या सगळ्यांना सांगितल्या.

मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांनी जागेवरूनच अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांमध्ये आदेश दिले. नुकसान भरपाईचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत थेट खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Devendra Fadnavis visits Nimgaon village in Solapur district to assess the flood situation here.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात