विशेष प्रतिनिधी
पुणे : Agriculture Minister Bharne राज्यात अतिवृष्टीमुळे ६६ लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये. या संकटाच्या काळात राज्य शासन आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे, येत्या दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.Agriculture Minister Bharne
द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे ७० वे अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी पुण्यात झाले. त्या वेळी कृषिमंत्री भरणे बोलत होते. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त दीपक तावरे, आमदार अभिजित पाटील, यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड असोसिएशनचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष सोहन शिरगावकर आदी उपस्थित होते.Agriculture Minister Bharne
यावेळी भरणे यांच्या हस्ते ७० व्या वार्षिक अधिवेशनानिमित्त कार्य वृत्त पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. साखर उद्योग गौरव, सर्वोत्तम साखर कारखाना, तांत्रिक उत्कृष्टता, औद्योगिक उत्कृष्टता, जीवनगौरव आणि उल्लेखनीय कामगिरी अशा पुरस्काराचे वितरण झाले.
कारखान्याला सहकार्य
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव, कामगारांना वेळेत वेतन, बोनस देणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य शासनाच्यावतीने सहकार्य मिळेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App