विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला. पण या सामन्यात पाकिस्तान खेळाडूंच्या नापाक हरकती देखील दिसल्या. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावताच बॅटनं AK47 प्रमाणे गोळीबाराची ॲक्शन केली. साहिबजादा फरहानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. पण भारतीय संघाने पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव करून फरहानच्या बॅटीतून निघालेल्या गोळ्या पाकिस्तानच्याच घशात घातल्या. Pakistani Farhan
फरहानने केलेल्या ॲक्शनच्या विरोधात भारतीयांनी सोशल मीडियावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, सामना सुरु असताना ज्यावेळी साहिबजादा फरहानने गोळीबाराची ॲक्शन केली, त्यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू त्यावेळी इरफान पठाण कॉमेंट्री करत होता. साहिबजादा फरहानच्या या कृत्यावर आता भारताची देखील फलंदाजी अद्याप बाकी आहे. ते देखील येतील…भारतीय फलंदाज देखील सेलिब्रेशन करतील, असं इरफान पठाण म्हणाला.
– अभिषेक शर्माने पाकिस्तान्यांना धुतले
172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला मैदानात उतरले. अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत दमदार सुरुवात केली. चारही बाजूंनी चौकार-षटकारांचा वर्षाव होत होता. नवव्या षटकातच भारताने शतक गाठलं. अभिषेक शर्मानं फक्त 24 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात अभिषेक शर्माने 39 चेंडूत 74 धावा केल्या. यामध्ये 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे.
– अशी केली धुलाई
पाकिस्ताननं भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने हे आव्हान आरामात पार केले. अभिषेक शर्माने 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 74 धावा फटकावल्या, तर शुभमन गिलनं 47 धावांचं योगदान दिले. या दोघांनी 105 धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मानं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर फखर जमानने 15, सईम अयुबने 21, मोहम्मद नवाजने 21, सलमान आगाने 17 आणि फहीम अश्रफने 20 धावा केल्या. भारताकडून शिवम दुबेने 2 विकेट्स पटकावल्या, तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App