विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis देशात आता नवीन जीएसटीचे दर उद्यापासून (22 सप्टेंबर) लागू होणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना नवीन जीएसटी धोरणावर भाष्य केले आहे. 22 सप्टेंबर रोजी सूर्योदयासह जीएसटी बचत महोत्सव सुरू होईल. समाजातील सर्व घटकांना याचा फायदा होईल. पंतप्रधानांनी जनतेला फक्त देशवासीयांच्या कठोर परिश्रमातून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून हे देशातील क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.CM Fadnavis
नवीन जीएसटी धोरणवार बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातील क्रांतिकारी पाऊल आहे. यामुळे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ज्याच्या किंमती कमी होणार आहेत, कारण त्याच्यावरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे. देशांतर्गत प्रॉडक्शन वाढणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. विशेषतः आत्मनिर्भर भारतकडे जो आपला प्रवास आहे तो या सेकंड जनरेशनच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे मी तमाम भारतीयांच्या वतीने मोदीजींचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.CM Fadnavis
नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित मेरा देश पहले कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित मेरा देश पहले हा कार्यक्रम मनोज मुंतशीर यांच्या संकल्पनेतून आज मुंबईत होणार आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मेरा देश पहले’, हा मनोज मुंतशीर यांनी संकल्पित केलेला कार्यक्रम अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील असा कार्यक्रम आहे. मोदीजींच्या जीवनातले जे प्रसंग लोकांना माहिती नाहीत, नरेंद्र मोदी नावाचे व्यक्तिमत्व कसे घडते, कशाप्रकारे ही विचारसरणी तयार होते, त्या साठी किती कष्ट घेतले जातात ही एक आधी न सांगितलेली कथा, ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजापुढे येत आहे. देशातील सहा महानगरांमध्ये हा कार्यक्रम होत आहे. त्यातला मुंबईतला कार्यक्रम आज आहे. आम्ही देखील सगळे हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहोत.
जीएसटीमध्ये कपात केल्याने एमएसएमईंना मोठा फायदा- पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले, जीएसटी दरात कपात आणि नियम आणि प्रक्रिया सुलभ केल्याने एमएसएमईंना मोठा फायदा होईल. त्यांची विक्री वाढेल आणि त्यांना कमी कर भरावा लागेल. त्यांना दुप्पट फायदा देखील होईल. एमएसएमईंकडून मला खूप अपेक्षा आहेत. जेव्हा भारत प्रगतीच्या शिखरावर होता, तेव्हा एमएसएमई त्याचा पाया होता. भारतात उत्पादित वस्तूंची गुणवत्ता श्रेष्ठ होती. आपल्याला ते वैभव परत मिळवायचे आहे. आपली उत्पादने जगात सर्वोत्तम असली पाहिजेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App