विशेष प्रतिनिधी
मुंबई : BJP सराईत खोटेपणा आणि माफी वीर ही राहुल गांधी यांची खरी ओळख आहे. आता ज्या निवडणूक आयोगावर अत्यंत खोटे आरोप बेछूट पद्धतीने राहुल गांधी करत आहे त्याबद्दल अनेकांना त्यांच्या खोटेपणाच्या आत्मविश्वासाबद्दल आश्चर्य वाटत आहे. पण ही खोटं बोलण्याची राहुल गांधी यांची पहिली वेळ नाही, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.BJP
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, राहुल गांधी यांना यापूर्वी खोटं बोलण्यावरून कोर्टाने फटकारले होते. राफेल प्रकरणी राहुल गांधी यांनी बिनशर्त माफी मागितली होती. दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांना माफी मागावी लागली होती. हे काही त्यांनी माफी मागण्याचे पहिले उदाहरण नाही असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला आहे.BJP
राहुल गांधींनी यापूर्वी देखील भूमिका बदलली
केशव उपाध्ये म्हणाले की, 2014 मध्येही एका प्रचार सभेत राहुल गांधी यांनी आरोप केला होता की महात्मा गांधी यांच्या हत्येत संघ होता, त्यानंतर त्यांना कोर्टात ज्यावेळी खेचण्यात आले त्यावेळी सुरूवातीला राहुल गांधीने अतिशय राणा भीमदेवी थाटात भूमिका घेतली. मी पुरावे सादर करेल काही बदलणार नाही पण प्रत्यक्षात सुप्रीम कोर्टाने कडक भूमिका घेतल्यावर संघाचा सहभाग नव्हता पण गांधी हत्येतील लोक संघाशी संबंधित नव्हते अशी भूमिका घेतली. यानंतर ज्यावेळी सर्जिकल स्ट्राइक केला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खून की दलाली असा अत्यंत नीच आणि गंभीर आरोप त्यांनी केला. ज्यावेळी देशभरातून त्यांच्यावर टीका सुरू झाली त्यानंतर माझा सर्जिकल स्ट्राइकला विरोध नाही असे आपल्या एक्स वरुन जाहीर केले. भूमिका राहुल गांधी बदलतात माफी मागतात.BJP
.. तर गोबेल्स शरमला असता
केशव उपाध्ये म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावर आतासुद्धा सावरकर प्रकरणी त्यांच्यावर केस सुरू आहे. त्यामध्ये सुद्धा त्यांनी सुरूवातीला वेगळी भूमिका घेतली नंतर भूमिका बदलली. एकूण खोटं बोलणं भूमिका बदलणे हा राहुल गांधी यांचा स्थायी भाव आहे. आज गोबेल्स असता तर राहुल गांधी यांचा खोटेपणा पाहून शरमला असता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App