विशेष प्रतिनिधी
मुंबई : Agriculture Minister राज्यात सुरू असलेला पाऊस थांबल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. जून आणि जुलै महिन्यातील नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही लवकरच मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीच्या उद्घाटनावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.Agriculture Minister
गेल्या काही दिवसांपासून राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिके डोळ्यासमोर नष्ट झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. कर्जमाफी आणि भरपाईच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले असून, सरकारवर दबाव वाढला आहे.Agriculture Minister
नेमके काय म्हणाले कृषिमंत्री?
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पंचनाम्यानंतर उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील लवकरच मदत मिळणार आहे.
राज्यात सध्या युरियाचा तुटवडा जाणवत आहे. यासंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असून, लवकरच शेतकऱ्यांसाठी “चांगली बातमी” दिली जाईल, असे आश्वासनही कृषिमंत्र्यांनी दिले.
कृषी विद्यापीठांतील रिक्त पदांबाबत लवकरच निर्णय
दरम्यान, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील रिक्त पदांबाबत पुढील दोन महिन्यांत ठोस निर्णय घेतला जाईल, असे भरणे यांनी सांगितले. अकोला विद्यापीठातील रिक्त पदांवरून विद्यापीठ प्रशासन आणि सरकार यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदांची दखल घेत सरकार निर्णय घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले
शिवारफेरीत 212 पिकांचे प्रात्यक्षिक
अकोला कृषी विद्यापीठाची 43 वी शिवारफेरी सुरू झाली असून, शिवारफेरीत हे 43 वे वर्ष साजरे केले जात आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 20 एकर क्षेत्रावर 112 खरीप पिके, 27 भाजीपाला पिके, 59 फुल वर्गीय पिकांसह एकूण 212 पिकांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. यासाठी विदर्भातील अकराही जिल्ह्यातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App