कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयी सुविधेसाठी नाशिक परिसरातील विमानसेवा सक्षम करा; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र एयरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड’च्या संचालक मंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक आणि परिसरातील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचे उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच विमानतळावरील विमानांच्या पार्किंगच्या सोयी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. Devendra Fadnavis

शिर्डीमध्ये विमानांच्या पार्किंगचे दर इतर विमानतळांच्या तुलनेत कमी ठेवावेत, असे स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिर्डीचे महत्त्व आणि येथील भाविकांची वाढणारी संख्या लक्षात घेता विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेलची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आवश्यक जागा निश्चित करून ताज ग्रुपसारख्या नामांकित हॉटेल कंपन्यांना येथे गुंतवणुकीसाठी निमंत्रित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

यवतमाळ येथील विमानतळाची धावपट्टी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच ज्या ठिकाणी खासगी कंपन्या विमानतळांचे संचालन स्वीकारतात परंतु नंतर ते बंद करतात, अशा प्रकरणांमध्ये संबंधित कंपन्यांवर दंड आकारण्यात यावा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट केले.

– नागपूरात रोजगाराला चालना

सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (एसडीएएल) या देशातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रियल एक्स्प्लोजिव व इनिशिएटिंग सिस्टीम्स उत्पादक व निर्यातदार कंपनीला मिहान च्या विशेष आर्थिक क्षेत्रातील सुमारे 223 एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. एसडीएएलने दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र शासनाशी याबाबतचा सामंजस्य करार केला होता. या करारानुसार कंपनी नागपूरमध्ये ‘अँकर मेगा डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्प’ उभारणार असून, यामध्ये ₹12,780 कोटींची गुंतवणूक व सुमारे 6825 थेट रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे कंपनी ₹660 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट व डिफेन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प उभारणार आहे. यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे 875 रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मिहानमध्ये संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील गुंतवणुकीला नवे बळ मिळून, नागपूर व विदर्भातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. या बैठकीस संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

CM Devendra Fadnavis chaired a meeting of Maharashtra Airport Development Company (MADC) Board of Directors

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात