विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये 17 सप्टेंबरला एक महत्वपूर्ण सैन्य करार झाला. दोन्ही दोन्ही देशांनी स्ट्रॅटेजिक म्यूचुअल डिफेंस एग्रीमेंट (SMDA) असे या कराराला नाव दिले. हा करार म्हणजे इस्लामिक नाटोची सुरुवात असल्याचे बोलले गेले. कारण पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये झालेला हा करार नाटो देशांसारखा आहे. इस्रायलने कतरची राजधानी दोहामध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने तातडीने असा करार केला.
पण उद्या भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास सौदी अरेबियाही त्यात उतरेल, असे संकेत पाकिस्तानने दिले. कारण दोघांपैकी कुठल्याही एकादेशावरील हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल असा हा करार सांगतो.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असीफ यांना जीओ टीव्हीवरील मुलाखतीत विचारण्यात आलं की, उद्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास या नव्या करारानुसार सौदी अरेबिया त्यात सहभागी होणार का??, त्यावेळी उत्तर देताना ख्वाजा असिफ भारताचे नाव घ्यायला घाबरले. त्यांनी भारताचे नाव घेतले नाही. पण ते म्हणाले की, “हो नक्कीच, अजिबात शंका नाही. अमुक एक देश आक्रमक आहे, असे आम्ही कुठल्याच देशाच नाव घेतलेले नाही. सौदी अरेबियाने सुद्धा त्या देशाचे नाव घेतलेले नाही. हल्ला कुठूनही झाला, तर आम्ही संरक्षण करणार. उत्तर एकत्र येऊन देणार”
सौदी अरेबियाला पाकिस्तानची अणवस्त्रे वापरता येतील का?
दोन देशांमध्ये झालेल्या करारांतर्गत पाकिस्तानची अणवस्त्र क्षमता सौदी अरेबियाला वापरता येणार का? त्यावर ख्वाजा असिफ यांनी टांग मारणारे उत्तर दिले. पाकिस्तानची अणवस्त्र क्षमता सौदी अरेबियाला उपलब्ध करुन दिली जाईल, असं ते म्हणाले. पण लगेच पुढे वेगळ्या खुलासा केला. “पाकिस्तानच्या अणवस्त्र क्षमतेबद्दल मी एक गोष्ट स्पष्ट करतो, आम्ही फार पूर्वीच अणवस्त्र क्षमता मिळवली आहे. त्यानंतर युद्धासाठी आम्ही आमच्या फोर्सेसना तयार केलं. आमच्याकडे जी क्षमता आहे, ती करारानुसार सौदी अरेबियाला उपलब्ध करुन दिली जाईल, असे ख्वाजा असिफ असे म्हणाले.
कराराचा विस्तार केला जाऊ शकतो का?
पण रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा असिफ यांनी परस्परविरोधी वक्तव्य केले. पाकिस्तानची अण्वस्त्रे या कराराच्या रडारवर नाहीत. अन्य आखाती देशांचा समावेश करण्यासाठी या कराराचा विस्तार केला जाऊ शकतो” असे ख्वाजा असिफ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App