Pakistan Saudi Arabia : पाकिस्तान-सौदीमध्ये महत्त्वाचा संरक्षण करार; पाक किंवा सौदीवर हल्ला म्हणजे दोघांवर हल्ला असेल

Pakistan Saudi Arabia

वृत्तसंस्था

रियाध : Pakistan Saudi Arabia पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियाच्या राजकारणावर परिणाम होऊ पाहणारा एक मोठा करार झाला आहे. पाकिस्तान आणि सौदी अरबने सैन्य करार केला आहे. दोन्ही देशांच्या संयुक्त स्पष्टीकरणानुसार, आता दोन्ही देश कोणत्याही आक्रमकतेविरुद्ध सोबत मिळून काम करतील. दोन्हीपैकी एका देशावर हल्ला झाल्यास तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. या सैन्य करारावर प्रतिक्रिया देताना गुरुवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल म्हणाले की, आम्हाला याची माहिती आधीपासून होती. आम्ही प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून या सैन्य कराराचे आकलन करत आहोत. ते म्हणाले, भारत स्वत:चे संरक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.Pakistan Saudi Arabia

पाकिस्तान आणि सौदी अरबकडून अजून सैन्य करारावरील सर्व नियम सार्वजनिक करण्यात आले नाहीत. मात्र पाकद्वारे सौदीला अणुसुरक्षा देण्याच्या प्रश्नावर सौदी अधिकाऱ्याने दावा केला की, करारात सर्व सैन्य पर्यायांचा प्रयोग केला जाऊ शकतो. पाक आणि सौदी अरबचे म्हणणे आहे की, गेल्या काही काळापासून दोन्ही देशांत या सैन्य कराराबाबत खल सुरू होता. आता तो अंतिम करण्यात आला. हा करार कोणत्याही तिसऱ्या देशाला समोर ठेवून करण्यात आलेला नाही, असेही दोन्ही देशांचे म्हणणे आहे.Pakistan Saudi Arabia



पाकचे दहशतवादी पुन्हा उचल खातील

पाक-सौदी सैन्य कराराचा परिणाम काय? सौदी अरब या कराराने पश्चिम आशियातील सैन्य समीकरण बिघडवत आहे. सौदी आपली सुरक्षा पाकला आऊटसोर्स करून आगीशी खेळत आहे. त्यामुळे पाकच्या दहशतवाद्यांना भारताविरुद्ध पुन्हा डोके वर काढण्याची संधी मिळेल. भारतावर या सैन्य कराराचा काय परिणाम? भारतासाठी ही सावधगिरी बाळगण्याची वेळ. मोठा प्रश्न हा की, भारताने ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू केल्यास सौदी अरब काय भूमिका घेईल? चेंडू आता सौदी अरबच्या पारड्यात राहील. करार कतारवरील इस्रायली हल्ल्यामुळे? कतार खरे तर पश्चिम आशियात सौदीच्या बाजूने नाही. सौदी आणि इस्रायल दीर्घकाळापासून मागच्या दाराने संपर्कात आहेत. सौदीला केवळ इस्रायलकडून पॅलेस्टाइनवर समाधान हवे. हा करार इस्लामी नाटोची तयारी आहे काय? पाक आणि २२ अरब देश इस्लामी नाटोचा विचार पुढे रेटत आहेत. त्यात पाकिस्तान हाच जगातील एकमेव अणुशस्त्र संपन्न देश आहे. मात्र या प्रस्तावित संघटनेत नाटोसारखे एकमुखी नेतृत्व असणारा देश अमेरिका नाही, त्यामुळे इस्लामी नाटो शक्य नाही. अमेरिकेची या करारावर काय भूमिका राहील? सौदी अरब पश्चिम आशियात आहे, तर पाक दक्षिण आशियातील अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापार आणि धोरणात्मक भागीदार. अमेरिका बॅलन्स ऑफ पॉवरसाठी असा करार स्वीकारणार नाही.

ताकद : पाकिस्तान आणि सौदी अरबची सैन्य क्षमता मिळूनही ती भारताहून कमीच

सौदी अरब : एकूण सैनिक ३.५ लाख, जगात २४ वे स्थान पाकिस्तान : एकूण सैनिक ९.५ लाख, जगात १२ वे स्थान भारत : एकूण सैनिक १४.५ लाख, जगात चौथ्या क्रमांकावर. भारताकडे ५ लाखांहून जास्त राखीव सैन्यही दिमतीला.

या कराराचे मध्यस्थ पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर

सौदी-पाक सैन्य कराराचे मध्यस्थ पाक लष्करप्रमुख असीम मुनीर ठरले. त्यांनी गुप्त बैठक घेऊन सौदी प्रिन्स सलमान यांना राजी केले. मुनीर यांनी गेल्या काही काळात दोन वेळा अमेरिकेचा दौराही केला आहे.

भारत जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश. जगभरातील एकूण शस्त्रांपैकी ९.८% एकटा भारत खरेदी करतो, तर दुसऱ्या क्रमांकावर सौदी अरब आहे. तो ८.४% जागतिक शस्त्रे खरेदी करतो. पाकिस्तान ४.६% शस्त्रांची खरेदी करतो.

Pakistan Saudi Arabia Sign Defense Pact

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात