विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange मराठा समाज संपूर्ण देशात विखुरलेला आहे. त्यामुळे लवकरच करोडो समाजबांधवांना घेऊन दिल्लीला जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. गुरुवारीते आंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते. हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी न्यायालयाचे आभार मानले. न्यायदेवता गोरगरिबांसाठी काम करते. देशात लोकशाही जिवंत आहे, असे जरांगे यावेळी म्हणाले.Manoj Jarange
याप्रसंगी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शरसंधान साधले. येवल्याचा अलिबाबा दोन आरक्षण खात आहे. त्यामुळे १६ टक्के आरक्षणाची श्वेतपत्रिका काढायला लावणार आहे, असे जरांगे म्हणाले. भुजबळ लोकांची भाजी चोरून आणून विकत होते. त्यांना आता लवकरच तुरुंगात जावे लागेल, असे जरांगे म्हणाले.Manoj Jarange
बंजारा समाजाच्या उपोषणाला मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली नाही. त्यावर जरांगे यांनी टीका केली. त्यांच्या समस्येकडे लक्ष न देणे कितपत योग्य आहे, असा सवाल जरांगे यांनी केला. दरम्यान, सरकारमधील काही लोकप्रतिनिधी जातीवाद करीत आहेत. ते जर सरकारमध्ये राहून जातीचे काम करत असतील, तर आमच्या नेत्यांनीही जातीचे काम करायला काय हरकत आहे. लवकरच आम्ही सर्वपक्षीय मराठा नेत्यांची बैठक घेऊ, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
गोलमेज परिषदेवर टीका
कुणी काय करावे आणि काय करू नये हे आजकाल अवघड झाले आहे. ज्यांना जे करायचे आहे ते करू द्या. जेव्हा वेळ होती तेव्हा ते आले नाहीत. वेळ गेल्यावर असे काही उकरून काढायचे, त्यावर मी काही बोलणार नाही. काहींचे दुकाने बंद पडत आहेत. काही, माना-पानाला भुकेलेले आहेत. काही तरी पिल्लू उकरून काढायचे आणि स्वत:ला खूप हुशार समजायचे. मग तेव्हा का आले नाहीत, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवारी झालेल्या गोलमेज परिषदेवर टीका केली. समाजातील गरीब मराठ्यांना वर कसे नेता येईल याकडे आम्ही लक्ष देण्याचे ठरवले आहे. समाज उघड्या डोळ्याने सगळे बघत आहे, असे जरांगे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App