OBC Protest : हैदराबाद गॅझेटियर जीआर रद्द करा; ओबीसींचा हिंगोलीत मोर्चा; राज्य सरकारच्या विरोधात घोषणा

OBC Protest

विशेष प्रतिनिधी

हिंगोली : OBC Protest राज्य शासनाने मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरबाबत काढलेला अध्यादेश रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी सकल ओबीसी समााजाच्या वतीने बुधवारी कळमनुरीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मराठवाड्यातून ओबोसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.OBC Protest

कळमनुरी येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या मोर्चात ओबीसी नेेते प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते यांच्यासह सकल ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आल्यानंतर प्रा. हाके यांनी मार्गदर्शन केले.OBC Protest

शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियरबाबत काढलेला अध्यादेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. सरकारवर तसेच विरोधी पक्षावरही टीका करण्यात आली. ओबीसी आरक्षण संपविण्यासाठी निघालेल्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. राज्यातील ओबीसी समाजाने एकत्र येऊन आरक्षण वाचविण्याची लढाई लढली पाहिजे.OBC Protest



आंदोलनकर्त्यांनी दिल्या राज्य सरकारच्या विरोधात घोषणा, राज्यातील ओबीसी समाजाने एकत्र यावे

हैदराबाद गॅझेटियरबाबत काढलेला अध्यादेश रद्द करण्यासाठी कळमनुरीत बुधवारी ओबीसींचा मोर्चा काढण्यात आला.या वेळी सहभागी झालेले समाजबांधव.

ओबीसी समाज धडा शिकवणार : प्रा. हाके

राज्यामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वितरित करून लोकप्रतिनिधी, सरकाराला मराठा समाजाच्या मतांची काळजी असेल तर यापुढे ओबीसी समाज त्यांना धडा शिकवेल, असा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला. हैदराबाद गॅझेटियरचा अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी यापुढे तीव्र आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व ओबीसी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या वेळी मोर्चात सहभागी झालेल्या इतर नेत्यांची भाषणे झाली. त्यांनीही सरकारने काढलेला हा जीआर तातडीने रद्द करावा, अशी मागणीही या वेळी केली.

OBC Protest Demands Cancellation Hyderabad Gazette

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात