दिवस ढळला, मोदींच्या रिटायरमेंटची मावळली आशा; पण विरोधकांसाठी खुली झाली “संधीची” नवी दिशा!!

Modi @75

17 सप्टेंबरचा दिवस ढळला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिटायरमेंट घेण्याची विरोधकांची मावळली आशा; पण त्याचवेळी जागतिक नेत्यांनी मोदींना दिल्या शुभेच्छा!!, त्यामुळे राहुल गांधींचा सकट सगळ्या विरोधकांच्या राजकीय जखमेवर राजकीय मीठ चोळले गेले.Modi @75, didn’t retire, gave opportunity to opposition to defeat him

आज 17 सप्टेंबरच्या वाढदिवशी नरेंद्र मोदी 75 वर्षांचे झाले. त्या दिवशी मोदींनी स्वतःच लावलेल्या नियमानुसार ते रिटायरमेंटची घोषणा करतील, अशी आशा विरोधक लावून बसले होते. राहुल गांधींपासून बाकी सगळे नेत्यांनी आडून आणि उघडपणे त्यांना तसे सूचितही केले होते. विरोधी नेत्यांनी मोदींना रिटायरमेंटचे टोमणे मारले होते. पण या टोमण्यांकडे मोदींनी दुर्लक्ष केले. त्यांनी आज रिटायरमेंटची घोषणा केली नाही. त्यामुळे 17 सप्टेंबरचा दिवस ढळता ढळता विरोधकांची मोदींच्या रिटायरमेंटची आशा मावळून गेली.



 

 जागतिक नेत्यांकडून शुभेच्छा

उलट मोदींची राजवट जास्तच पक्की आणि घट्ट झाली. कारण आत्तापर्यंत जेवढ्या जागतिक नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या, त्या सगळ्या जागतिक नेत्यांनी एकमुखाने मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, यांच्याबरोबरच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया यांचाही समावेश होता. न्युझीलँड, इजरायल, कॅरिबियन, युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया, जपान, इंडोनेशिया, सौदी अरेबिया वगैरे देशांच्या प्रमुखांनी मोदींना फोन करून किंवा ट्विटर द्वारे शुभेच्छा दिल्या. या सगळ्या नेत्यांनी मोदींच्या जागतिक नेतृत्वाची सराहना केली. जागतिक समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली. या सगळ्या प्रकारामुळे मोदींचा 75 वा वाढदिवस जागतिक इव्हेंट ठरला.

स्वतः मोदींनी मध्यप्रदेश मधल्या धार मध्ये अखिल भारतीय पातळीवरच्या सक्षम माता सशक्त परिवार अभियानाची सुरुवात केली. आजच्या दिवसभरात मोदी आणि त्यांच्या समर्थकांनी रिटायरमेंट नावाचा शब्द सुद्धा वापरला नाही. त्यातच जागतिक पातळीवरच्या सगळ्या नेत्यांच्या शुभेच्छा आल्यामुळे मोदींची रिटायरमेंट ही संकल्पना राजकीय हवेत उडून गेली.

उलट विरोधकांनाच दिली संधी

75 व्या वाढदिवसाच्या दिवशी मोदी रिटायर्ड झाले असते, तर मोदींना पराभूत करून घरी बसविण्याची विरोधकांची संधी कायमची निघून गेली असती. ती संधी मोदींनी घालवली नाही. उलट आपली गादी अधिक पक्की करून त्यावर जास्त पक्की मांड ठोकली. भारतातल्या नेत्यांकडून त्यांनी शुभेच्छा घेतल्याच, पण जागतिक पातळीवरच्या नेत्यांकडूनही शुभेच्छा घेऊन त्यांनी नव्या ऊर्जेने काम सुरू केले. त्यामुळे विरोधकांना सुद्धा मोदींना हरविण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्याची संधी मिळाली. आता ही नवी ऊर्जा विरोधक कसे वापरतात त्यावर मोदींची रिटायरमेंट, विजय किंवा पराभव अवलंबून आहे.

शिवाय विरोधकांना भाजपमधून येणाऱ्या नव्या नेतृत्वाशी लढाई करावी लागणार नाही त्यांना मोदींसारख्या जुन्याच नेतृत्वाशी लढाई करावी लागेल. ज्या लढाईचा त्यांना अनुभव आधीच आहे, त्या अनुभवातूनच विरोधकांना मोदींविरुद्धची लढाई पुढे नेता येईल.

– भारतात नेपाळ सारखे आंदोलने घडवता येतील.

– मनोज जरांगे यांना दिल्लीतले बैठक आणि मिळावे यशस्वी करता येतील.

– लिबरल लोकांना नवे नवे फंडे वापरून भारतात लोकशाही नसल्याचे ढोल ताशे बडविता येतील.

– नव्या फंड्यांसाठी जॉर्ज सोरोसकडून कडून फंड गोळा करता येईल. त्या फंडातून शाहीनबागेत नवे आंदोलन उभे करता येईल.

– बरे झाले, मोदी रिटायर्ड झाले नाहीत. त्यांनी आपल्या 75 व्या वाढदिवशी कुणालाही “निराश” केले नाही, ते असे!!

Modi @75, didn’t retire, gave opportunity to opposition to defeat him

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात