विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दुबईत आशिया कपच्या झालेल्या सामन्यात भारताचा भारताकडून दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तान्यांचा राग अनावर झाला. त्यातही भारतीय संघाने पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन केले नाही म्हणून तो राग जास्तच भडकला. पाकिस्तानी क्रिकेट फोटो भारताविरुद्ध वाटेल ते बराळायला लागले. पण तरी देखील काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतातल्या राजकारणावर शेरेबाजी करून आपल्या पसंती क्रमात राहुल गांधींना सगळ्यांमध्ये वरचे स्थान दिले. Rahul Gandhi tops Shahid Afridi’s list of favourites!!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी गाजला. दुबईतल्या सामन्यावर बहुतेक भारतीयांनी बहिष्कार घातला होता. त्यामुळे स्टेडियम मधल्या बहुसंख्य खुर्च्या रिकाम्या होत्या. पण त्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केला. विजयी षटकार मारून सूर्यकुमार यादव पवेलियनमध्ये निघून गेला त्यांनी ड्रेसिंग रूमचे दार लावून घेतले भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंची हस्तांदोलन केले नाही. त्यामुळे पाकिस्तानातले सगळे खेळाडू आणि बरेचसे राजकारणी भडकले. ते सगळे भारताविरुद्ध बरळले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सगळा राग काढून घेतला. मोहम्मद युसुफ हा तर एवढा भडकला की त्याने सूर्यकुमार यादवला सुवर कुमार अशी शिवी दिली.
राहुल गांधींवर आफ्रिदीची स्तुतिसुमने
पण या सगळ्यांमध्ये शाहीर आफ्रिदीची प्रतिक्रिया वेगळी ठरली. त्याने भारतातल्या राजकारणावर टीका टिप्पणी केली. क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तान हरल्याचा राग त्यांनी भारतीय राजकारणावर काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्याने संताप उगवला. भारतातले सध्याचे राज्यकर्ते हिंदू-मुस्लीम भेद करूनच सत्तेवर येत राहतील. हे सगळ्यात घाणेरडे राजकारण आहे, पण राहुल गांधी मात्र सकारात्मक विचारांचे नेते आहेत ते संवादावर विश्वास ठेवतात सगळ्यांची संवाद ठेवून सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे वाटचाल करतात अशा शब्दांमध्ये शाहिद आफ्रिदीने राहुल गांधींवर स्तुतिसुमने उधळली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App