Jitendra Awhad : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण हवे; जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केली भूमिका

Jitendra Awhad

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Jitendra Awhad ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी लोकांना कळेल की काय मिळालं? मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये , ही भूमिका आम्ही व्यासपीठावरून जाहीर करतो, असे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.Jitendra Awhad

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की,ओबीसी विरुद्ध मराठा हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. दोन्ही समाजांना अस्वस्थ करण्यात यश आले आहे. काल छगन भुजबळ साहेबांबाबत बोलले गेले की, त्यांच्या पोटात, गळ्यात लाथ मारा आणि मंत्रिमंडळातून हाकलून द्या. अशा ज्येष्ठ नेत्याचा आणि मंत्र्याचा अपमान राज्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही.Jitendra Awhad



जमीनदार मराठा अल्पभूधारक

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्रात स्थापन झाला आहे, तर गांधीची हत्या करणाराही महाराष्ट्रातच जन्माला आला आहे. हैदराबाद गॅझेटवर अनुसूचित जमातीचे (ST) अधिकारी नाहीत. हे गॅझेट लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी लोकांना कळेल की, त्यांना काय मिळाले आहे. भुजबळ ओबीसी समाजाचे नेते आहेत. सरकारमधील नेतेच जर बोलत नसतील, तर ओबीसी समाजाची काय अवस्था असेल?.आज जमीनदार मराठा अल्पभूधारक झाला आहे. आरक्षण कोणा एकासाठी येत नाही. मराठा समाजासाठी आम्ही सोबत राहू.

वाद पेटवण्याचे काम सुरू

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, इतरांनाही आरक्षण द्या, आम्ही तुमच्यासोबत लोकसभेत उभे राहू. मराठा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत आणल्यास त्यांचे खासदार मराठा समाजाला पाठिंबा देतील. मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावण्यात सरकार यशस्वी झाले आहे,असे ते म्हणाले. हा वाद पेटवण्याचे काम सुरू असून, याचे मूळ राजकारणात असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात आव्हाड यांनी शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील राजकीय संस्कृतीचे उदाहरण दिले. गोपीनाथ मुंडे यांनी पवार साहेबांवर टीका केली असताना, वातावरण तापले होते. त्यावेळी पवार साहेबांनी रात्री अडीच वाजता पोलिसांची बैठक घेऊन मुंडेंची सुरक्षा व्यवस्था तीनपट वाढवण्याचा आदेश दिला होता, अशी आठवण त्यांनी करून दिली.

Jitendra Awhad Clarifies Maratha Reservation Stand

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात