नाशिक : ट्रम्प टेरिफच्या अतिरेकामुळे अमेरिकेत महागाईचा कहर उडाला असून भारतामध्ये मात्र जीएसटी कमी केल्याने स्वस्ताईची लहर आली आहे. भारतातल्या वेगवेगळ्या कंपन्यांनी स्वस्त केलेल्या वस्तूंच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. ट्रम्प टेरिफच्या फाटक्यातून सावरण्यासाठी या कंपन्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत.Trump tariff explodes cost of living in America
अमेरिकेत महागाईचा कहर
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरेकी टेरिफ लादल्यानंतर भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंना त्याचा मोठा फटका बसला. पण त्याचा दुष्परिणाम मात्र अमेरिकेतल्या बाजारपेठेवर झाला. अमेरिकेत 2024 च्या ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यांची तुलना करता 2025 च्या ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यात महागाई 2.9 % ने वाढली. ब्रेड, अंडी, दूध, तांदूळ, बटाटे, चिकन यांच्या किमती गगनाला भिडल्या. भारतीय रुपयांमध्ये एक डझन अंड्यांना 300 रुपये मोजायला लागले, तर चिकन 175 रुपये पाव किलो झाले. त्याचबरोबर दूध 350 रुपये लिटर झाले. अमेरिकेत राहणाऱ्या कुटुंबांचा किराणामाल आणि खाण्याच्या पदार्थांवरचा खर्च रुपयांमध्ये तब्बल 75600 वर पोहोचला. जो डॉलर्स मध्ये 900 युनिटच्या आसपास पोहचला. त्यामुळे ट्रम्प टेरिफच्या अतिरेकाचा फटका अमेरिकेतल्या सर्वसामान्य ग्राहकांना बसल्याचे स्पष्ट झाले. त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेत राजकीय आणि सामाजिक अस्वस्थताही वाढली.
भारतात स्वस्ताईची लहर
त्या उलट भारतात ट्रम्प टेरेसच्या अतिरेकाचा फटका सहन करण्याची एक उपाय योजना म्हणून मोदी सरकारने विविध वस्तूंवरील GST कमी केला. GST कमी करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 22 सप्टेंबर पासून करण्याची घोषणा केली. त्यामुळे भारतात स्वस्ताईची लहर आली. वस्तूंच्या किमती 5 रुपयांपासून 60 ते 90 रुपयांपर्यंत कमी झाल्या. वेगवेगळ्या कंपन्यांनी स्वस्त झालेल्या वस्तूंच्या याद्या जाहीर केल्या. त्यामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू, जीवनावश्यक वस्तू, औषधे यांच्याबरोबरच साबण, शाम्पू, सौंदर्यप्रसाधने यांचाही समावेश झाला. लोकांना दररोजच्या वापरासाठी लागत असलेल्या वस्तू स्वस्त करण्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची स्पर्धा लागली. कारण ही उत्पादने जागतिक बाजारपेठेत विकण्यापेक्षा भारतात विकणे या कंपन्यांना उचित वाटू लागले. त्यामुळेच हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा वगैरे कंपन्यांनी स्वस्त झालेल्या वस्तूंच्या याद्या प्रसिद्ध केल्या.
स्वस्ताईची यादी
हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने लाईफ बॉय साबण आठ रुपयांनी, वेगवेगळे शाम्पू 55 ते 70 रुपयांनी, तर टूथपेस्ट 16 रुपयांनी स्वस्त केले. जामची किंमत 10 रुपयांनी स्वस्त झाली. वुमन हॉर्लिक्सची किंमत 36 रुपयांनी, कॉफीची किंमत 30 रुपयांनी, टोमॅटो सूपची किंमत 10 रुपयांनी बूस्ट ची किंमत 14 रुपयांनी स्वस्त केली.
औषधेही स्वस्त
भारतातल्या वेगवेगळ्या औषध कंपन्यांनी स्वस्त झालेल्या औषधांची यादी प्रसिद्ध केली. त्यामुळे सणवारांच्या काळात सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न यशस्वी झाला. स्वस्त झालेल्या वस्तू लवकरच कंपन्यांच्या आऊटलेट्समध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या मार्केटमध्ये लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात कंपन्या आघाडीवर आल्या. विविध वस्तू स्वस्त केल्यामुळे भारतातच विक्री वाढेल. निर्यातीत बसलेला फटका भरून निघेल, अशी आशा कंपन्यांना निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App