विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : PM Modi’s visit to Manipur : मागील दोन वर्षापासून हिंसाचाराच्या छायेत असणाऱ्या मणिपूरला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. मे 2023 पासून मणिपूर मध्ये कोर्टाच्या एका निर्णयावरून दोन जातींमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली होती. त्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत गेली. मणिपूर मध्ये झालेल्या हिंसाचारात हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आणि लाखो नागरिक बेगर झाले आहेत.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरचा दौरा केला आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर मधील सरकार बरखास्त करून मणिपूर मध्ये राष्ट्रपती लाजवट लागू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दौऱ्या दरम्यान अनेक विकास कामांचे भूमिपूजन केले आहे. ईशान्येकडील पाच राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 71 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यांची सुरुवात आज मिझोराम येथून केली आहे. मिझोराम ला भारतीय रेल्वे नेटवर्क सोबत जोडणाऱ्या बैराबी ते सैरांग रेल्वे मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांनी आज केले
मणिपूर मध्ये बोलत असताना नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या समस्यांवर यावेळी भाष्य केले. तसेच त्यांनी 2014 पासून मणिपूरला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडण्यासाठी सरकार कार्यरत असलेल्या प्रयत्नांची चर्चा केली. मणिपूरच्या जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि मणिपूर मध्ये शांतता टिकून विकास साध्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवाशीयांना शांततेचे आवाहन केले. सर्व संघटनांना त्यांनी शांततेच्या मार्गावर राहण्याचे आवाहन केले. भारत सरकार मणिपूर सोबत असल्याचे त्यावेळी त्यांनी बोलून दाखवले. मणिपूरच्या नावातच मनी असल्याचे पंतप्रधान यावेळी बोलले. भारत सरकार येणाऱ्या काळात ईशान्यकडील राज्यांचा विकास करेल. याचाच एक भाग म्हणून आपण इथे आले असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
हिंसेबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ” आम्हाला आनंद आहे की काही दिवसापासून हिल आणि व्हॅली मधील समुदायांमध्ये शांततेचा करारावर सहमती झाली आहे. भारत सरकार संवाद , सन्मान आणि शांती यासाठी काम करत आहे “.
या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये 7000 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन केले . मागील काही वर्षांमध्ये राष्ट्रीय महामार्गासाठी मणिपूरमध्ये 3700 करोड रुपये खर्च केले आहेत आणि 8700 करोड रुपये गुंतवले जाणार आहेत अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. मणिपूरची धरती ही आशा आणि आकांक्षांची धरती आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. मागील काही दिवसापासून दुर्भाग्यवश हिंसेनी या क्षेत्रावर आपली छाया टाकली आहे. परंतु येणारा काळ हा मणिपूरच्या दारात नवी पहाट घेऊन येईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App