विशेष प्रतिनिधी
मुंबई : VoteChori : वोटचोरीच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने काढलेल्या पत्रकात काँग्रेसच्या मतचोरीच्या आरोपाला पाठिंबा दिला आहे. या परिपत्रकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता वोटचोरीच्या या आंदोलनाला वादाची किनार लागण्याची शक्यता आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर मतदान चोरीचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला आलेले थोडेफार यश महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र पाण्यावरचा बुडबुडा असल्याचे सिद्ध झाली. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने भाजपाने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान याद्यांमध्ये घोळ केला असल्याचे दावे करायला सुरुवात केले आहे. पत्रकार परिषदा घेऊन आणि वोट अधिकार यात्रा काढून काँग्रेसने लोकमत एकटवण्याचा प्रयत्न चालवला आहे. इंडिया आघाडीतील अनेक पक्ष देखील वोटचोरीचा मुद्दा उचलून धरत आहेत. अशातच आता नक्षलवाद्यांनी देखील काँग्रेसच्या सुरात सूर मिसळल्याचे दिसत आहे.
नक्षलवादाचा सेंट्रल कमिटीने नुकत्याच काढलेल्या पत्रकार काँग्रेसच्या मतचोरी संदर्भातील आरोपांना पाठिंबा दिला आहे. या पत्रकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर बोट चुडी करून सत्ता मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून विधानसभा आणि इतर निवडणुका वटचरी करून जिंकत असल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी व भाजपने याच पद्धतीने विजय मिळवल्याचा आरोप सेंट्रल कमिटीने केला आहे . देशात अनेक वर्षापासून वोट चोरीचा खेळ सुरू असून, काँग्रेसने हा मुद्दा जनतेसमोर आणण्यास उशीर केल्याचे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. या मतचोरीविरोधात जन आंदोलनाची गरज असल्याचेही नक्षलवाद्यांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. या परिपत्रकात भारत सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ हे थोतांड असल्याचे यामध्ये म्हटले आहे. टेरीफ मुळे अमेरिका भारतावर दबाव टाकत असल्याचा उल्लेख या परिपत्रकात करण्यात आला आहे.
भारताच्या अंतर्गत येथे समोर आव्हान असलेल्या नक्षलवादी संघटनेने अशा प्रकारचे आरोप केल्यामुळे आणि जनआंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. नक्षलवाद ही भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर समस्या आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये सातत्याने अस्थिरतेचे वातावरण निर्माण होत असताना अशा प्रकारच्या राष्ट्रवादी गटाकडून जल आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली गेली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आता या मुद्द्यावर सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App