नाशिक : ठाकरे बंधूंच्या मिलनामध्ये शिवसेना + मनसेचे सैनिक मग्न; राजकीय कोमात ढकलले पवार आणि राहुल गांधींचे पक्ष!! अशी राजकीय अवस्था आज नाशिक मधल्या शिवसेना आणि मनसे यांच्या मोर्चातून दिसून आली. नाशिक मध्ये शिवसेना आणि मनसे यांनी काढलेल्या संयुक्त मोर्चाला शिवसैनिक आणि मनसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिला पण महाविकास आघाडीतले दोन घटक पक्ष शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राहुल गांधींची काँग्रेस यांचा या मोर्चात मागमूसही दिसला नाही. Shivsena MMS morcha
दोन्ही ठाकरे बंधूंचे ऐक्य दोन-चार भेटीगाठी नंतर पुढे सरकल्यानंतर शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये सैनिकांना स्फुरण चढले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी छोटे-मोठे संयुक्त कार्यक्रम आयोजित केले, पण नाशिकमध्ये मात्र शिवसेना आणि मनसे यांनी आज संयुक्त महामोर्चा काढला. नाशिक मधल्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड फोडण्यासाठी हा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाला शिवसैनिक आणि मनसैनिक यांनी तुफान गर्दी केली होती.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांनी या संयुक्त मोर्चाचे नेतृत्व केले. त्यामध्ये दोन्ही पक्षांचे नाशिक मधले मोठे नेते हिरीरीने सामील झाले होते. या मोर्चाने नाशिक मध्ये जुन्या शिवसेनेची आठवण करून दिली. ठाकरे बंधूंचे मनोमिलन होताना शिवसैनिक आणि मनसैनिक यांचे देखील मनोमिलन झाल्याचे दिसले. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे यांची युती करण्याची पार्श्वभूमी या मोर्चातून तयार करण्यात आली.
– पवार + राहुल गांधींच्या च्या पक्षांना बाय-बाय
पण या सगळ्या मोठ्या राजकीय प्रक्रियेत नाशिक मधले पवार आणि राहुल गांधी यांचे पक्ष मात्र राजकीय दृष्ट्या कोमात ढकलले गेले. आजच्या मोर्चामध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राहुल गांधींची काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण द्यावे असे सुद्धा शिवसेना आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांना आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांना वाटले नाही. कारण या दोन्ही पक्षांची नाशिक मधले अवस्था दखलपात्र देखील नाही, याची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांना खात्री होती. नाशिक मध्ये स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांमध्ये नावं घ्यावेत असे नेते आणि कार्यकर्तेही उरले नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना बोलावले काय आणि नाही बोलावले काय त्यामुळे आपल्या मोर्चामध्ये आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसादामध्ये काहीच फरक पडणार नाही, असे शिवसेना आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष यांना आपल्या संयुक्त मोर्चापासून बाजूलाच काढून दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App