विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने काढलेला GR पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या जीआर विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मात्र, त्याच बरोबर आमचे सरकार असेपर्यंत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या जीआरला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांनी आधी जीआर समजून घेण्याची मागणी देखील त्यांनी केली.Devendra Fadnavis
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येकाला याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. मात्र, राज्य सरकारने जो जीआर काढला आहे, तो विचारपूर्वक काढलेला आहे. तो कायदेशीर आहे. हा जीआर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही. हा जीआर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही. हा जीआर ज्यांच्याकडे पुरावा आहे, जे खरे पुराव्याने कुणबी आहेत, त्यांनाच जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी मदत करतो. त्यामुळे न्यायालयात देखील राज्य सरकारच्या वतीने योग्य भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Devendra Fadnavis
सरसकट कोणालाही आरक्षण दिलेले नाही
ओबीसी समाजातील नेत्यांनी राज्य सरकारच्या जीआरला विरोध केला आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा एकदा ओबीसी समाजातील नेत्याला सांगू इच्छितो की, त्यांनी जीआर नीट वाचावा. कोठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेले नाही. कायद्याने, पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच आरक्षण मिळणार आहे, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही
ओबीसी समाजाच्या वतीने राज्य सरकारच्या जीआर विरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र अशा पद्धतीचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांशी माझी देखील चर्चा सुरू आहे. त्यांना मी ज्यावेळी नेमका जीआरचा अर्थ सांगतो, त्यावेळी त्यांचे समाधान देखील होते. मात्र कोणाला राजकीय दृष्टीकोणातुन एखादे काम करायचे असेल तर ते आपण थांबवू शकत नाही. मात्र सामाजिक दृष्टिकोनातून जोपर्यंत आमचे सरकार आहे, तोपर्यंत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला दिलासा दिला आहे.
उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर खोचक टीका
आगामी काळात नवरात्रोत्सव येत आहेत. या नवरात्र उत्सवामध्ये कुंकवाचे फार महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज देखील आई तुळजाभवानीच्या कुंकवाचा टिळा लावून युद्धाला सामोरे जात होते. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे हिंदुत्व परत आले असेल, त्यामुळे त्यांना कुंकवाचे महत्त्व समजले असेल. त्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आई तुळजाभवानीचे कुंकू पाठवणार असतील, तर आई भवानीचे कुंकू त्यांनी मला देखील पाठवावे. तुळजाभवानीच्या कुंकवाचा टिळा आम्ही नक्की लावू, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App