PM Modi : पंतप्रधान मोदींकडून उत्तराखंडला १,२०० कोटींची मदत जाहीर

PM Modi 

विशेष प्रतिनिधी

डेहराडून : PM Modi  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडमधील पुरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला. ढगफुटी, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यभर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाराणसीत मॉरिशसचे पंतप्रधान नविनचंद्र रामगुलाम यांच्यासोबत अधिकृत कार्यक्रम पार पाडल्यानंतर मोदी थेट देहरादूनला पोहोचले.PM Modi

देहरादून येथे झालेल्या अधिकृत बैठकीत मोदींनी मदत आणि पुनर्वसन उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी राज्यासाठी १,२०० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली.PM Modi

पंतप्रधानांनी सांगितले की, पुनर्बांधणीसाठी बहुआयामी दृष्टिकोन अवलंबला जाणार आहे. यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे पुन्हा बांधणे, राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती, शाळांची पुनर्बांधणी, पंतप्रधान राष्ट्रीय राहत निधीतून मदत आणि जनावरांसाठी मिनी किट्सचे वितरण या उपायांचा समावेश असेल.PM Modi



विशेषत: ग्रामीण भागात पूरग्रस्त घरांचे पुनर्निर्माण करण्यासाठी उत्तराखंड सरकारने सादर केलेल्या ‘विशेष प्रकल्पा’अंतर्गत पीएम आवास योजना–ग्रामीण योजनेतून पात्र कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले जाईल.

यापूर्वी केंद्र सरकारकडून आंतरमंत्रीय समित्या उत्तराखंडला पाठवण्यात आल्या आहेत. त्या समित्यांचा सविस्तर अहवाल आल्यानंतर पुढील मदत आणि उपाययोजनांवर निर्णय घेतला जाईल.

PM Modi announces Rs 1,200 crore aid to Uttarakhand

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात