महाराष्ट्र – ऑस्ट्रेलिया इंडस्ट्री राऊंड टेबल कॉन्फरन्स; महाराष्ट्राचे जागतिक भागीदारीकडे मार्गक्रमण!!

Devendra Fadnavis,

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन ओएएम यांच्या अध्यक्षतेखाली बीकेसी, मुंबई येथे ‘आयएबीसीए ग्लोबल लीडर्स फोरम 2025’ अंतर्गत ‘महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इंडस्ट्री राऊंड टेबल’ कॉन्फरन्स झाली.devendra fadanvis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वात उद्योगस्नेही व गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य आहे. गुंतवणूकदारांना आणि उद्योजकांना पोषक इकोसिस्टिम देण्यासाठी राज्य शासन नेहमीच तत्पर आहे.

राज्य सरकार विविध क्षेत्रांसाठी नवीन व परिपूर्ण धोरणे तयार करत आहे. येत्या काळात 14 क्षेत्रांसाठी धोरणे जाहीर केली जातील, ज्यामध्ये सेवा क्षेत्रालाही विशेष स्थान असेल. उद्योजकांना आवश्यक परवानग्या त्वरित मिळाव्यात यासाठी ‘मैत्री पोर्टल’ हे खऱ्या अर्थाने ‘सिंगल विंडो सिस्टीम’ म्हणून कार्यरत आहे.



मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’मध्ये सुधारणा, नवीन गुंतवणूक संकल्पना, राज्यातील एक्सप्रेसवेचे जाळे, वाढवण बंदराच्या माध्यमातून सागरी व्यापाराची संधी, सांडपाणी व्यवस्थापन, सौर ऊर्जा, पायाभूत सुविधा अशा क्षेत्रांत गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पुणे येथील नवीन विमानतळ आणि जलद वाहतुकीसाठी उभारले जाणारे पायाभूत सुविधा प्रकल्प शहराच्या विकासाला गती देतील. तसेच, नवी मुंबईतील एज्यु सिटीमध्ये जागतिक विद्यापीठांचे कॅम्पस उभारले जात असून, ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ व गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या सहकार्याने गडचिरोली हे देशाचे स्टील हब होईल.

या राऊंड टेबल कॉन्फरन्सपूर्वी झालेल्या संवादात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी नेहमीच सकारात्मक निर्णय घेते. महाराष्ट्र जागतिक भागीदारीत आघाडी घेईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी मंत्री जयकुमार रावल व इतर मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra – Australia Industry Round Table Conference; Maharashtra’s path towards global partnership!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात