विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Supreme Court refuses to hear India-Pakistan match : एशिया चषक 2025 स्पर्धेदरम्यान रविवारी होणारा भारत पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या याची केवळ तत्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने तात्काळ सुनावणीला नकार दर्शवला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक 2025 या स्पर्धेदरम्यान येत्या 14 सप्टेंबरला क्रिकेट सामना होणार आहे. पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून भारताने पाकिस्तान सोबत क्रिकेट सामने खेळू नयेत असे मागणी होत आहे. भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळणे म्हणजे शहीद जवानांचा अपमान असल्याची टीका विरोधकाकडून केली जात आहे. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात हिरवा कंदील दाखवला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामने आला आदर्शकांचा मोठा प्रतिसाद असतो. त्यामुळे या सामन्यामुळे नियमक मंडळाला मोठा महसूल मिळतो. खेळ आणि राजकारण हे दोन वेगळे विषय असल्याने हा सामना होण्यास कोणतीही अडचण नसल्याचे भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे मत आहे. दरम्यान राष्ट्रीय भावनेचा आदर करून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द केला जावा यासाठी अनेकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. रविवारी हा सामना होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने यावर तात्काळ सुनावणी करावी अशी याचिका कर्त्यांची मागणी होती.
न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने या याचिकांवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दर्शवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की “हा केवळ एक सामना आहे, तो होऊ देण्यात काहीही वावगे नाही. ”
उर्वशी जैन यांच्या नेतृत्वात चार लोकांनी सुप्रीम कोर्टात या सामन्याच्या विरोधात धाव घेतली होती. याचिकाकर्त्याच्या मतानुसार पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर यांचा विचार करता पाकिस्तान सोबत क्रिकेट मॅच आयोजित करणे राष्ट्रीय जनभावनेच्या विरोधात संदेश देणारे ठरेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामना दोन्ही देशा दरम्यान सद्भावना आणि मित्रता असल्याचे दर्शवेल. हा विपरीत संदेश जाईल. वादाच्या विरोधात आपले सैनिक प्राणाची अवती देत आहेत आणि आपण त्याच देशासोबत खेळून आनंद उत्सव साजरा करत आहोत. हे राष्ट्रीयतेच्या भावनेला धरून नाही. अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती.
सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घेण्यास आणि सामना रद्द करण्यास नकार दर्शवला असल्यामुळे येत्या रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App