नेपाळ मधली सत्ता उखडली जाताच नेपाळचे माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी भारताविरुद्ध गरळ ओकले, पण त्याच वेळी नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी नेपाळच्या महाराजांचा फोटो लावून देशाला संबोधित केले. या दोन्ही घटना नेपाळमध्ये वेगवेगळ्या घडल्या असल्या तरी त्यांच्यातले सूत्र एक आहे. नेपाळमध्ये माओवादी कम्युनिस्टांची सत्ता उखडली गेली आहे आणि नेपाळची हिंदू राष्ट्राकडे वाटचाल पुन्हा सुरू झाली असून त्या राष्ट्रात राजेशाहीची पुन्हा स्थापना करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. hindu king portrait nepal
नेपाळमध्ये gen z त्या आंदोलनात पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची सत्ता उखडली गेली. भारताविरुद्ध फायर रिंग तयार करायची म्हणून श्रीलंका, बांगलादेश यांच्या पाठोपाठ नेपाळमध्येही उद्रेक घडवून आणण्यात अमेरिका यशस्वी ठरली, असे यानिमित्ताने बोलले गेले. भारताभोवतीच्या देशांमध्ये सत्ता उलथवून लावून तिथे अस्थिरता निर्माण केली की त्याचे परिणाम भारतावर घडवून आणणे सोपे होईल असा अमेरिकेचा होरा असल्याचे बोलले गेले. कारण श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात अमेरिकेला अनुकूल सरकारे आणली गेली. त्याचबरोबर पाकिस्तानातही अमेरिकेच्या ताटाखालची मांजरे सत्तेवर राहिली.
– भारत आणि श्रीरामा विरुद्ध भूमिका
या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये प्रचंड उद्रेक होऊन जाळपोळ होऊन माओवादी प्रभावाखालचे के. पी. शर्मा ओली यांचे सरकार गेले. त्या शर्मांना नेपाळी लष्कराच्या छावणीत आश्रय घेणे भाग पडले. पण तिथूनच त्यांनी भारताविरुद्ध गरळ ओकले. मी भारताविरुद्ध बोललो. श्रीराम नेपाळी होते श्रीरामांची खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे भारताने बनावट अयोध्या निर्माण करून तिथे रामजन्मभूमी मंदिर बांधले असे भूमिका मी घेतल्याने मी सत्तेवर टिकून राहू शकलो नाही, असा दावा के. पी. शर्मा ओली यांनी त्यांच्या पार्टीच्या सरचिटणीसाला लिहिलेल्या पत्रात केलाय. 2008 मध्ये नेपाळ मधली राजेशाही उलथवून माओवाद्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर त्या देशात 30 पेक्षा जास्त पंतप्रधान झाले. नेपाळ अस्थिरतेच्या गर्तेत लोटला गेला. माओवाद आणला तर नेपाळी जनता सुखी समाधानी होईल असा दावा त्यावेळी केला गेला होता, पण प्रत्यक्षात नेपाळची हालत खस्ता होत गेली. तरी देखील माओवाद्यांनी सत्तेवरची पकड सोडली नव्हती ती पकड आता सुटली. Gen z आंदोलनाने माओवाद्यांना नेपाळमधून उखडून फेकायला सुरुवात केली. केपी शर्मा ओली यांची सत्ता जाणे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच त्या शर्मांनी भारताविरुद्ध गरळ ओकली. ज्या चीनच्या नादी लागून माओवाद्यांनी नेपाळची सत्ता बळकावली होती त्याची सत्ता टिकवण्यात मदत केली नाही त्याबद्दल त्या शर्मांनी चकार शब्द काढला नाही पण त्यांनी भारताविरुद्ध मात्र गरळ ओकली.
– नेपाळच्या लष्कर प्रमुखांचे संबोधन
त्याचवेळी नेपाळचे लष्कर प्रमुख अशोक राज सिग्देल यांनी देशाला संबोधित केले. त्यांनी नेपाळचे संस्थापक महाराज पृथ्वीराज नारायण शाह यांचा फोटो सन्मानाने लावून देशाला उद्देशून भाषण केले. देशात कोणत्याही लष्कर अराजक माजू देणार नाही. जनतेने लष्कराला शांतता निर्माण करण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पण लष्कर प्रमुखांच्या भाषणापेक्षा त्यांनी नेपाळच्या संस्थापक महाराजांचा फोटो लावून ते भाषण केले या विषयाची चर्चा अधिक झाली. कारण त्यांनी या एकाच गोष्टीतून सगळ्या जगाला महत्त्वाचा संदेश दिला. नेपाळमध्ये माओवाद अपयशी ठरला नेपाळची वाटचाल पुन्हा राजेशाहीकडे सुरू झाली आहे नेपाळ पुन्हा हिंदुराष्ट्र घोषित होण्याच्या बेतात आहे या संदेशाची पेरणी नेपाळी लष्कर प्रमुखांनी सूचक पद्धतीने केली.
Gen Z ची सफाई मोहीम
नेपाळमध्ये प्रचंड उद्रेक घडवून आणून Gen Z ने माओवादी प्रवृत्तीची सत्ता उखडली. नेपाळ मधल्या तरुणाईने प्रचंड जाळपोळ केली. नेपाळची संसद, नेपाळच्या पंतप्रधानांची घरे जाळली. या सगळ्याचे रिपोर्टिंग जगभर झाले. पण नेपाळची जी तरुणाई जाळपोळीसाठी रस्त्यावर उतरली त्याच तरुणाईने नंतर नेपाळच्या रस्त्यांवर आणि जाळपोळ झालेल्या ठिकाणी साफसफाई केली. हजारो हात त्या साफसफाई मध्ये गुंतले होते. भ्रष्टाचारी सरकार उखडले. आपले काम झाले म्हणून नेपाळी तरुणाईने हात झटकला नाही त्या उलट तेच हात त्यांनी सफाईच्या कामाला लावले.
श्रीलंका आणि बांगलादेशातही तरुणांनी रस्त्यावर उतरून तिथली सत्ता उखडली असे दाखविले गेले. पण या दोन्ही देशांमधल्या तरुणांनी नंतर अशी कुठली साफसफाई केल्याचे चित्र दिसले नाही. हे चित्र फक्त नेपाळमध्ये दिसले.
– भारतात उद्रेक घडविण्याचे स्वप्न
जसा उद्रेक नेपाळमध्ये घडला आणि तिथली माओवाद्यांची सत्ता गेली तसाच उद्रेक भारतात घडवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सत्ता उखडून टाकण्याचे स्वप्न मलेशिया वीर आणि लिबरल लोक बघतायेत. त्यासाठी कारणांची जंत्री देताहेत. पण भारतामध्ये तरुणाई पासून अन्य कुठल्याही घटकांचा कितीही उद्रेक झाला तरी भारताचे संविधानिक सरकार मजबुतीने काम करते हा गेल्या 75 वर्षांचा इतिहास लिबरल लोक विसरले. केवळ मोदींची सत्ता उखडण्याचे स्वप्न पाहत राहिले त्यासाठी पुरस्कार वापसी पासून शाहीन बागेपर्यंतची आंदोलने करून राहिले, पण त्यामुळे मोदी सरकारचा केसही वाकडा झाला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App