वृत्तसंस्था
बंगळुरू : Actor Darshan रेणुकास्वामी हत्याकांडात तुरुंगात असलेला कन्नड अभिनेता दर्शनने तुरुंगात विष देण्याची विनंती केली आहे. दर्शन मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ६४ व्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हजर झाला.Actor Darshan
त्याने न्यायालयाला सांगितले की, आता त्याला तुरुंगातील परिस्थिती सहन करणे कठीण झाले आहे. दर्शन म्हणाला की, मला तुरुंगाबाहेर जाण्याची परवानगी नसल्याने मी अनेक दिवसांपासून सूर्यप्रकाश पाहिला नाही.Actor Darshan
अभिनेता म्हणाला, ‘माझ्या हातांना बुरशी आली आहे. माझ्या कपड्यांना दुर्गंधी येते आहे. मी आता असे जगू शकत नाही. कृपया मला विष द्या. येथे जीवन जगणे असह्य झाले आहे. मी तुरुंगात गंभीर समस्यांना तोंड देत आहे.’Actor Darshan
दर्शनच्या अपीलवर न्यायाधीशांनी सांगितले की, अशा गोष्टी करता येणार नाहीत. हे शक्य नाही. न्यायालयाने आरोप निश्चित करण्यासाठी प्रकरणाची सुनावणी १९ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अभिनेत्याचा जामीन रद्द केला होता.
डिसेंबर २०२४ मध्ये रेणुकास्वामी हत्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेता दर्शनला जामीन मंजूर केला होता, परंतु साक्षीदारांशी छेडछाड केल्याच्या आशयाचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयाने १४ ऑगस्ट २०२५ रोजी त्याचा जामीन रद्द केला.
त्याला पुन्हा अटक करण्याचे आदेश देताना, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले की, जर तो जामिनावर बाहेर राहिला, तर खटल्यावर परिणाम होऊ शकतो. कोठडीत त्याला कोणत्याही विशेष सुविधा देऊ नयेत, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते.
दर्शनवर रेणुका स्वामी यांचे अपहरण आणि हत्या केल्याचा आरोप आहे .
चित्रदुर्ग येथील रहिवासी ३३ वर्षीय रेणुकास्वामी यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी जून २०२४ मध्ये दर्शनला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आरोप केला आहे की, रेणुकास्वामी यांनी अभिनेत्याची जवळची मैत्रीण पवित्रा गौडा यांना अश्लील संदेश पाठवल्यानंतर त्यांना लक्ष्य करण्यात आले. प्रथम त्याचे अपहरण करण्यात आले, छळ करण्यात आला आणि नंतर त्याचा मृतदेह बंगळुरूमधील एका नाल्यात सापडला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App