सरकारे कोसळण्याचा दिवस; फ्रान्स आणि नेपाळ मधली सरकारे आज एकाच दिवशी घरी!!; भारतात कुणाच्या मतांमध्ये फाटाफुटी??

नाशिक : आज 9 सप्टेंबर 2025 सरकारे कोसळण्याचा दिवस ठरला. फ्रान्स आणि नेपाळ या दोन देशांमधली सरकारे आज एकाच दिवशी घरी जाऊन बसली. फ्रान्समध्ये पंतप्रधान फ्रांको बायरु यांच्याविरुद्ध फ्रेंच संसदेने अविश्वास ठराव मंजूर केला. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, तर नेपाळ मधल्या हिंसाचाराने टोक गाठून राष्ट्रपती सदन जाळण्यापर्यंत मजल गेली. त्यानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. भारतात आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. ही निवडणूक “सरळ” असली तरी, या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे मते घटणार की विरोधी आघाडीची मते फुटणार??, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

फ्रेंच पंतप्रधानांचा राजीनामा

फ्रान्समध्ये तिथल्या संसदेने पंतप्रधान फॅन्को बायरु यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव संमत केला. फ्रॅंको बायरु हे साधारण वर्षभरापासून फ्रान्समध्ये पंतप्रधान पदावर होते. ते सुरुवातीला फ्रान्सचे अध्यक्ष इम्युएल मॅक्रोन यांचे “लाडके” पंतप्रधान होते. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये फ्रान्समध्ये घडलेल्या विशिष्ट घडामोडीनंतर फ्रॅंको बायरु अप्रिय होत गेले. त्यांनी फ्रान्समध्ये आर्थिक सुधारणा राबविण्याचा प्रयत्न केला. फ्रान्स वरचे आंतरराष्ट्रीय कर्ज कमी करण्यासाठी खर्चात कपातीचा प्रस्ताव मांडला. पण तो फ्रेंच खासदारांना रुचला नाही. फ्रेंच खासदारांची त्यांच्यावर मर्जी राहिली नाही. त्यामुळे फ्रेंच खासदारांनी संसदेत त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणून मंजूर करून घेतला. फ्रॅंको बायरु यांना घरी जावे लागले. त्यांच्या पाठोपाठ आता अध्यक्ष इम्युअल मॅक्रोन यांचा राजीनामा मागण्यासाठी फ्रान्स मधले नागरिक पुढे आले आहेत. एक तर नवा पंतप्रधान नियुक्त करणे किंवा संसद बरखास्त करून नव्याने निवडणुका घेणे हे दोन पर्याय फ्रान्सच्या अध्यक्षांपुढे आहेत. फ्रान्स सध्या अंतर्गत आर्थिक गंभीर परिस्थितीतून जात आहे. त्याला अध्यक्ष मायक्रोन हेच जबाबदार आहेत, असा फ्रान्समधल्या सर्व राजकीय पक्षांचा आरोप आहे.



नेपाळी पंतप्रधानांचा राजीनामा

नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आणल्यानंतर तिथली तरुण पिढी भडकली. त्यांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. राष्ट्रपती सदन जाळण्यापर्यंत त्यांची मजल पोहचली. त्यामुळे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. केपी शर्मा ओली हे नुकतेच चीनमध्ये जाऊन आले होते. तिथे त्यांनी व्हिक्टरी परेडला हजेरी लावली होती. त्यामुळे ते अमेरिकेच्या मर्जीतून उतरले होते. के. पी. शर्मा ओली यांचा चीन दौरा आटोपून तीनच दिवस झाल्यानंतर नेपाळमध्ये हिंसाचार उसळला. त्याची परिणीती त्यांच्या राजीनाम्यात झाली. अनेकांनी त्याचे कनेक्शन अमेरिकेच्या इतराजीशी जोडले. अमेरिकन deep state ने नेपाळ मधले सरकार घालविले, असा दावा अनेकांनी केला.

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणाची मते फुटणार??

फ्रान्स आणि नेपाळ या दोन देशांमधील सरकारे आज एकाच दिवशी घरी गेली. भारतात आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीतली मते घटणार की विरोधकांची मते फुटणार??, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असला, तरी जर सत्ताधारी आघाडीची मते काहीशी घटली, तरी तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव मानण्यात येईल. हे लक्षात घेऊन सत्ताधारी आघाडीतल्या खासदारांची मते फोडायचा डाव विरोधकांनी आखल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी सत्ताधारी आघाडीतून विरोधकांची सुमडीत कोंबडी कापायचा डाव असल्याचेही बोलले जात आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यातला मतदानाचा फरक बरेच काही राजकीय सत्य सांगून जाईल.

Major termoil in the world, french and Nepali governments collapsed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात