भुजबळांचे अवसान गळाले, कॅबिनेट बैठकीलाही हजर आणि फडणवीसांची देखील भेट; पण त्याचवेळी शरद पवार आणि अजित पवार यांचाही कळवळा!!

Bhujbal

नाशिक : मराठा आरक्षणावर जीआर करणाऱ्या फडणवीस सरकारला आव्हान देणाऱ्या छगन भुजबळ यांचे अवसान अवघ्या दोन दिवसांमध्ये गळाले. सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला. त्याच्या निषेधार्थ आधीच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घालणाऱ्या छगन भुजबळ यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीत भाग घेतला. ते त्या बैठकीला हजर राहिले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देखील दिले, पण त्याचवेळी छगन भुजबळ यांना शरद पवार आणि अजित पवार यांचाही कळवळा आला.

मराठा आरक्षणाच्या जीआरला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या छगन भुजबळांना अवघ्या दोन दिवसांमध्ये उपरती झाली. आपणच सहभागी असलेल्या कॅबिनेटच्या निर्णयाला ते हायकोर्टात आव्हान देणार होते. त्यांनी आधीच्या कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे फडणवीस सरकार मधले मतभेद चव्हाट्यावर आले होते. फडणवीस सरकारच्या प्रतिमेवर परिणाम झाला होता. सरकारमध्ये मंत्रीपदावर राहूनच भुजबळ फडणवीस सरकारला आव्हान देत होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही राजकीय परिस्थिती व्यवस्थित “हाताळली.” ते भुजबळांच्या मागणी पुढे झुकले नाहीत. यातून योग्य तो “राजकीय संदेश” त्यांनी भुजबळांपर्यंत पोहोचविला. त्यानंतर भुजबळ यांच्यात “मतपरिवर्तन” झाले.

– मंत्रीपदावरच शेकले असते

छगन भुजबळांनी कॅबिनेटच्या बैठकीला हजेरी लावली त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना जीआर संदर्भात निवेदन दिले. भुजबळांनी आपली भूमिका सौम्य केली. पण ती भूमिका सौम्य केली नसती, तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहजासहजी भुजबळांचे ऐकले नसते. कदाचित त्यांच्या मंत्रिपदावरही गदा येऊ शकली असती, हे लक्षात घेता भुजबळ यांनी राजकीय चतुराईने आपली बंडखोरीची मशाल हळूच शमवून टाकली. त्याचवेळी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांची कड घेतली. कारण ओबीसी समाजाच्या बैठकीमध्ये आणि नंतरच्या जाहीर सभांमध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. छगन भुजबळ यांनी ती टीका अमान्य केली. शरद पवार आणि अजित पवार यांना या विषयावर दोष द्यायचे काहीच कारण नाही. कुठल्याही पक्षांच्या नेत्यांवर टीका करून आरक्षणाचा विषय भरकटला जातो, असा दावा त्यांनी केला.

पण फडणवीस सरकारमध्ये सरकारने काढलेल्या जीआरचा विषय फार ताणून धरून चालणार नाही. तो विषय ताणला तर आपल्यावरच शेकेल आणि मंत्रिपदावर गदा येईल, याची भीती वाटल्यानेच छगन भुजबळ यांनी भूमिका बदलून ते कॅबिनेट बैठकीला हजर राहिले.

Bhujbal’s last breath, attended the cabinet meeting and also met Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात