विशेष प्रतिनिधी
सांगली : Jaykumar Gore ओबीसी समाजाच्या हक्कासाठी जे देवेंद्रजींनी सोसले आहे तो अन्य कोणीही सोसलेले नाही, असे विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक, वैचारिक आणि वैयक्तिक पातळीवर हल्ले असतील किंवा टार्गेट केले गेले असेल, पण मी जबाबदारीने सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर कोणतीही गदा येणार नाही, अडचण येणार नाही यासाठी मी आश्वस्त करतो, असे आश्वासन गोरे यांनी दिले आहे.Jaykumar Gore
जयकुमार गोरे म्हणाले, आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे. मात्र सरकार म्हणून आमचे एवढेच सांगणे आहे की सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाच्या हक्काचे रक्षण करताना ओबीसी समाजाचे हक्काचे रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि आम्हा सगळ्यांवर आहे. मुख्यमंत्री फडणवीस या बाबतीत एकदम ठाम आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाने काळजी करू नये, असेही गोरे म्हणाले.Jaykumar Gore
एमपीडी कायद्याने अवैध धंदा करणाऱ्यांवर कारवाई
दरम्यान, निरेच्या पाण्याच्या प्रश्नावरून रविवारी आंदोलन करण्यात आले होते. यावर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, निरेच्या पाण्याचा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला त्यांना माझे सांगणे आहे की त्यांनी खुदके गिरेबान में कभी झाककर देखना चाहिये. आपण स्वतः आपल्याकडे बघितले पाहिजे आपण काय करतोय. मी जेव्हापासून पालकमंत्री झालो आहे तेव्हापासून अवैध वाळू, मुरूम किंवा कुठलाही अवैध व्यवसाय चालू देणार नाही, ही भूमिका मांडलील होती. ज्यांनी अवैध धंदे केले त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि अजूनही कारवाई चालू आहे. 100 टक्के थांबले असे मी म्हणणार नाही, पण बहुतांश ठिकाणी आम्ही आळा घातला आहे. अजूनही काही ठिकाणी उपसा सुरु असल्याची तक्रार आहे. मी त्याबाबतीत तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. कधी नव्हे ते एमपीडी कायद्याने आपण अशा लोकांवर कारवाई केली, असेही जयकुमार गोरे म्हणाले.
प्रत्येक अधिकाऱ्यांच्या पाठीशी मी उभा
अजित पवारांच्या कॉल प्रकरणी जयकुमार गोरे म्हणाले, अजितदादांच्या बाबतीत त्यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जो प्रकार घडला त्याचे समर्थन कोणी करणार नाही पण गैरसमजातून झालेला हा प्रकार आहे. पण या विषयाच राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतोय. इथे बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे. कुठल्याही बाबतीत कुठल्याही अधिकाऱ्यावर दबाव टाकता येणार नाही. दबाव आला तर प्रशासनाच्या पाठीशी मुख्यमंत्री उभे आहेत. चांगले काम करणाऱ्या, बेकायदेशीर कामांना आळा घालणाऱ्या, लोकाभिमुख कामे करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांच्या पाठीशी मी उभा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App