विशेष प्रतिनिधी
बीड: Hake Pandit controversy : काही दिवसांपूर्वी गेवराईत गेलेल्या लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावर विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी दगडफेक केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून हाके यांचे समर्थक देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण पोलिसांच्या मध्यस्थितीमुळे हा वाद सुटला होता. त्यानंतर पोलिसांनी या राड्यामुळे हाके यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गेवराई पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. ह्या राड्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात काही दिवसासाठी जमावबंदी देखील लागू केली होती.
काल लक्ष्मण हाके पुन्हा गेवराईत गेले होते. या वेळी हाके समर्थकांनी यांचे जोरदार स्वागत सुद्धा केले. हाके यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी गर्दी केली होती. गेवराईत आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते.विजयसिंह पंडित यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला होता. आझाद मैदानात त्यांनी मनोज जरांगे यांची भेट देखील घेतली होती.
या सगळ्या बदल गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण हाके यांच्या बद्दल प्रश्न विचारून पत्रकारांनी त्यांना डिवचले असता त्यांनी प्रखड प्रतिक्रिया दिली. “लक्ष्मण हाके यांना माझा विरोध नाही परंतु प्रवृत्तीला माझा विरोध आहे. माझा कोणत्याही समाजाला विरोध नाही मी किंवा मी कोणत्याही एका समाजाचा आमदार नाही मी संपूर्ण जनतेचा प्रतिनिधी आहे. लक्ष्मण हाके हे जर समाजाचे प्रश्न घेऊन माझ्याकडे आले असते तर मी तुमचं स्वागतच केलं असतं. परंतु लक्ष्मण हाके हे प्रीपेड व्हाउचर प्रमाणे रिचार्ज होतात. सध्या लक्ष्मण हाके यांचे रिचार्ज एका वर्षाच्या मोठ्या पॅक प्रमाणे केलेले आहे. ज्यांनी हे रिचार्ज केला आहे त्याच्याबद्दलही मला माहिती आहे. ” असे विजयसिंह पंडित यांनी म्हटले.
लक्ष्मण हाके हा बाजारू श्वान आहे मोकाट कुत्रा आहे मी त्याच्यावर बोलावं हे मी संयुक्तिक समजत नाही अशा शब्दात विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हाके वर हल्लाबोल केला. गेवराईतून निवडणूक लढवण्याच्या हाके यांनी दिलेल्या इशाऱ्यावर मी त्यांचे स्वागत करतो अशी प्रतिक्रिया पंडित यांनी दिली.
मी संविधानाचा रक्षक आहे संविधानानुसार काम करणारा माणूस आहे असं हाके बोलतात मात्र वेळोवेळी येऊन एका संविधानिक पदावर असलेल्या प्रतिनिधी विरुद्ध दंड थोपटतात. त्यांच्या या संविधान विरोधी प्रवृत्तीला माझा विरोध आहे. असे विजयसिंह पंडित म्हणाले.
आपली ॲक्शन ही त्यांच्या ॲक्शनला रिएक्शन होती. पण यापुढे आपण त्यांच्या ॲक्शनला रिएक्शन देणार नाहीत असे पंडित यांनी स्पष्ट केले. आपल्या दृष्टीतून लक्ष्मण हाके हा विषय संपला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या या टीकेला लक्ष्मण हाके काय उत्तर देतात हे पहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App