Ajit Pawar : महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर; माझ्यासाठी कायद्याचे राज्य महत्त्वाचे, अजितदादांची महिला IPS वादावर स्पष्टोक्ती

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ajit Pawar सोलापूर जिल्ह्यात महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा यांच्या सोबत बोलताना अजित पवार यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यासंबंधीचा वाद वाढल्यानंतर अखेर अजित पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. पोलिस दलातील महिला अधिकाऱ्यांबद्दल माझ्या मनात सर्वोच्च सन्मान आणि आदर आहे. त्यांच्या कामात हस्तक्षेप करण्याचा माझा उद्देश नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.Ajit Pawar

संदर्भात अजित पवार यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये त्यांनी मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.Ajit Pawar



अजित पवार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…

अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.’

रोहित पवारांनी केली अजित पवारांची पाठराखण

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी अजित पवारांचे जोरदार समर्थन केले आहे. ते म्हणाले, राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली 35-40 वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.

करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे, त्यामुळं आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं. आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधत राहू, असे ते म्हणालेत.

नेमके प्रकरण काय?

सोलापूरमध्ये करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. प्रत्यक्षात, डीएसपी अंजली कृष्णा रस्ते बांधकामासाठी बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी माढा तालुक्यातील कुर्डू गावात पोहोचल्या होत्या. गावकरी आणि घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट फोन करून डीएसपी अंजली कृष्णा यांना फोन दिला. या संदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने थेट अजित पवार यांना फोन केल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. यावरुन अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे.

गावकऱ्यांनी नेमका मुरूम कशासाठी उपसला?

कुर्डू या गावात रस्त्यांच्या अभावी येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामस्थांनी पाणंद रस्त्यामध्ये गावच्या रस्त्याचे काम सुरू केले होते आणि त्यासाठी मुरूम उपसला जात होता. या कामासाठी ग्रामपंचायतने ठराव केला असून सर्व कागदपत्रे देखील आहेत. परंतु, अचानक पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांनी येथे कारवाई केली. त्यामुळे गावकरी आणि प्रशासन असा वाद सुरू झाला. वाद आणखी चिघळू नये म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबा जगताप यांनी थेट पवारांना फोन लाऊन दिला होता

Ajit Pawar clarifies on women IPS officer controversy, ‘I have utmost respect’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात