मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतरही पवार संस्कारितांचीच भांडणे चव्हाट्यावर; फडणवीसांना धक्का लावण्यात अपयश आल्याबद्दल चडफडाट!!

नाशिक : मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी आनंद व्यक्त केला, तर छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला. लक्ष्मण हाके यांनी देखील सरकारवर आगपाखड केली, पण त्यानंतरही मनोज जरांगे यांनी फडणवीस सरकारने काढलेल्या जीआरचे समर्थन केले. पण या सगळ्या घडलेल्या राजकारणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकीय धक्का लावण्यात अपयश आल्याबद्दल पवार संस्कारितांचा प्रचंड चडफडाट झाला आणि त्यांनी आपल्यातली भांडणे चव्हाट्यावर आणली. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ हे दोघेही पवार संस्कारित पुन्हा एकदा आमने-सामने आले.

– कोळसे पाटील + असीम सरोदे जरांगेंवर नाराज

पण मनोज जरांगे यांनी फडणवीस सरकारच्या जीआर वर विश्वास ठेवून उपोषण आंदोलन मागे घेतले त्याबद्दल पवार संस्कारितांनी प्रचंड चडफडाट व्यक्त केला. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आणि वकील असीम सरोदे यांनी मनोज जरांगे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचे नुकसान केल्याचा आरोप कोळसे पाटलांनी केला तर मराठा समाजाला फक्त जीआर मधून आरक्षण देता येणार नाही. मनोज जरांगे यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन केले पाहिजे असा सल्ला असीम सरोदे यांनी दिला. मनोज जरांगे यांना सरकारने फसविले. मनोज जरांगे फसले, असा टोला सरोदे यांनी हाणला.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून आरक्षण मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे मत बी जी कोळसे पाटील आणि असीम सरोदे या दोघांनीही व्यक्त केले. नेमका हाच मुद्दा शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अधोरेखित करून सांगितला होता. त्यांनी मराठा आरक्षणाचे घोंगडे केंद्र सरकारच्या गळ्यात घालायचा प्रयत्न केला होता. तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा 72 % पर्यंत पोहचू शकते तर महाराष्ट्रात तशी मर्यादा का नाही वाढणार??, असा सवाल करून शरद पवारांनी केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करायची सूचना केली होती. पवारांच्या या वक्तव्याची री कोळसे पाटील आणि सरोदे यांनी ओढली. म्हणूनच दोघांनी जरांगे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी गावागावांमध्ये नको त्या अधिकाऱ्यांची तोंडे पाहायला लागतील. त्यांनी सर्टिफिकेट दिले तर ठीकच नाहीतर कोर्ट आहेच, सगळ्या प्रकारच्या जीआर मुळे घडणार आहे. मी मनोज जरांगे यांना रडून सांगत होतो तुम्ही मराठ्यांचे नुकसान करू नका पण त्यांनी ऐकले नाही, असा दावा कोळसे पाटील यांनी केला.



– भुजबळांचा मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार

दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांनी मागच्या दाराने घुसखोरी केली, असा आरोप करत लक्ष्मण हाके यांनी कोर्टात जायची भाषा केली पण त्यापलीकडे जाऊन पवार संस्कारित मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन देखील मंत्रिमंडळाच्या बहिष्कार घालण्याची भाषा वापरून तशी कृती केली.

– जरांगेंकडून जीआरचे समर्थन

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्णपणे अडचणीत आणायचा पवार संस्कारितांचा इरादा होता. त्यातच केंद्र सरकारला ओढून मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी चिघळवायचा पवारांचा डाव होता. पण मनोज जरांगे यांनी कोर्टाच्या कारवाईच्या शक्यतेने सरकारचा जीआर मान्य केला. त्या जीआरचे नंतर समर्थन देखील केले. कुठल्याही किड्या मकोड्यांचे ऐकून सरकारच्या जीआर ला विरोध करू नका. मराठा समाजाचे कधीच नुकसान करणार नाही जे मी नुकसान केल्याचे बोलताय ते खोटं बोलतायेत, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखायचे ते दुखू द्यात असा टोला त्यांनी हाणला.

– फडणवीस विरोधी राजकारण फसले

पण या सगळ्या राजकारणातून देवेंद्र फडणवीस यांना धक्का देण्याचा पवार संस्कारितांचा इरादा मात्र धाडकन कोसळला त्यामुळे सगळ्यांचा चडफडाट झाला. त्यातून पवार संस्कारी त्यांची भांडणेच चव्हाट्यावर आली.

Pawar supporters from both sides fuming over Maratha reservation agitation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात