मराठा आंदोलनाचे “राजकीय दिग्दर्शक” कोण??; सगळ्या मराठा आमदारांनी मनोज जरांगेंच्या चरणी राजीनामे अर्पण करावेत; इम्तियाज जलील यांचे आव्हान!!

नाशिक : मनोज जरांगे यांनी चालविलेल्या मराठा आंदोलनाचे राजकीय दिग्दर्शक कोण??, या आंदोलनातून कुणाला राजकीय पोळी भाजायची आहे??, या सवालांची उत्तरे सगळ्या महाराष्ट्राला माहिती असताना संबंधित आंदोलन वेगळ्याच दिशेने नेण्याचा खेळ तिसऱ्याच पार्टीने सुरू केल्याचे राजकीय वास्तव समोर आले. AIMIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन सगळ्या मराठा आमदारांना जरांगे यांच्या चरणी राजीनामे अर्पण करायला सांगितले. यातून अर्बन नक्षल ते कट्टर इस्लामिस्ट यांचे कनेक्शन समोर आले.

मुंबई हायकोर्टाने झापले

मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन पाचव्या दिवसात पदार्पण करताना मुंबई हायकोर्टाने त्यांना झापले. आंदोलनाच्या नावाखाली जे काही सुरू आहे ते बेकायदा सुरू आहे पाच हजार लोकांना आंदोलन करायची परवानगी दिली असताना हजारो लोक आंदोलन स्थळी घुसतायेत मुंबईत धुडगूस घालताहेत, हे सहन करण्या पलीकडचे आहे, अशा शब्दांमध्ये मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे आणि राज्य सरकार यांना फटकारले. मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतरही मनोज जरांगे समर्थकांनी आझाद मैदानातून हटणार नाही. गोळ्या घातल्या तरी इथून जाणार नाही, अशी दमबाजी चालविली.



इम्तियाज जलील यांची सूचना

हायकोर्टामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना AIMIM चे खासदार इम्तियाज जलील मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले. तिथून त्यांनी राज्यातल्या सगळ्या मराठा आमदारांना टोकले. मराठा आमदार मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून फटकून राहताहेत. न्यायालयाच्या अडून सरकारला मनोज जरंगे यांचे आंदोलन दडपून टाकायचे आहे. राज्यातल्या सगळ्या मराठा आमदारांनी मनोज जरांगे यांच्या चरणावर आपले राजीनामे अर्पण केले पाहिजेत. राज्यातल्या 100 मराठा आमदारांनी जरी राजीनामे दिले तरी देवेंद्र फडणवीस यांना 10 दिवसांमध्ये निर्णय घेणे भाग पडेल, अशी मखलाशी इम्तियाज जलील यांनी केली. मनोज जरांगे यांच्या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीला AIMIM ने फार पूर्वीपासूनच पाठिंबा दिला आहे, याची आठवण इम्तियाज जलील यांनी करून दिली.

 

मुस्लिम + मराठा कॉम्बिनेशन

या सगळ्या राजकारणातून इम्तियाज जलील यांनी वेगळाच डाव खेळला. ‌राज्यातल्या मराठा आमदारांना राजीनामा देण्याची फूस लावून इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे वेगळीच मोठी राजकीय फोडणी दिली. उत्तर प्रदेशात जसा मुलायम सिंग यादव यांनी मुस्लिम + यादव एकत्र आणायचा फॉर्म्युला राबवून दोनदा सत्ता मिळवली, तसाच महाराष्ट्रात मराठा + मुस्लिम एकत्र आणायचा फॉर्म्युला राबविण्याचा डाव आधी शरद पवारांनी खेळून पाहिला आणि आता त्याला इम्तियाज जलील यांनी वेगळी राजकीय फोडणी दिली. मराठा आमदारांनी राजीनामे दिले, तर राज्यात अराजक निर्माण होईल आणि त्या अरजकाचा वेगळा राजकीय लाभही उपटता येईल, असा होरा इम्तियाज जलील यांनी बांधला. म्हणूनच त्यांनी सगळ्या मराठा आमदारांना राजीनामा देण्यासाठी डिवचले.

All Maratha MLAs should offer their resignations at the feet of Manoj Jarange; Imtiaz Jalil’s appeal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात