विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेले. त्यामुळे मुंबई आज (2 सप्टेंबर) दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरुप आलंय. त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टानं दिलेत. तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी,मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टानं दिले होते. त्यानंतर मुंबईत पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात कायदेशीर अटी शर्ती यांचे उल्लंघन झाले म्हणून पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर आज नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजवली आहे. आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांनी देण्यात आलेल्या अटी आणि शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगे यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिसांन जरांगे यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याबाबत पत्रात म्हटले आहे. तसेच पत्रात मनोज जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तव्यचाही पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये केला आहे, तर नोटीस मिळाली नसल्याचं कोअर कमिटीचा दावा केला आहे.
मुंबई पोलिसांनी नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय? प्रति, आमरण उपोषण अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना. १) श्री. किशोर आबा मरकड (कोअर कमिटी सदस्य), २) श्री. पांडुरंग तारक (कोअर कमिटी सदस्य), ३) श्री. शैलेंद्र मरकड (कोअर कमिटी सदस्य), ४) श्री. सुदाम बष्पा मुकणे (कोअर कमिटी सदस्य), ५) श्री. बाळासाहेब इंगळे (कोअर कमिटी सदस्य), ६) श्री. अॅड. अमोल लहाणे (कोअर कमिटी सदस्य), ७) श्री. श्रीराम कुरणकर (कोअर कमिटी सदस्य), ८) श्री. संजय कटारे (कोअर कमिटी सदस्य),
ज्याअर्थी, मा. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. २५६५६/२०२५ (अॅमी फॉऊंडेशन वि. महाराष्ट्र राज्य व इतर) च्या सुनावणीमध्ये दिनांक २६/०८/२०२५ रोजी दिलेल्या आदेशात खालीलप्रमाणे निर्देश दिले होते :-
१) प्रतिवादी क्र. ०५, ०६ व ०७ म्हणजेच आपण स्वतः, श्री. विरेंद्र पवार व आमरण उपोषण अंतरवाली सराटी, यांनी “जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५ अन्वये सक्षम प्राधिकारी यांची परवानगी प्राप्त केल्याशिवाय आझाद मैदान, मुंबई येथे कोणतेही आंदोलन करू नये.
२) प्रतिवादी यांना असे आंदोलन करावयाचे असल्यास त्यासाठी त्यांनी “जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५” अन्वये अर्ज सादर करावा.
३) मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत होवू नये यासाठी प्रतिवादी यांना खारघर, नवी मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यास पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने विचार करावा.
४) सक्षम प्राधिकारी यांनी प्रतिवादी यांना “जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५ अन्यये आंदोलन करण्यास परवानगी दिल्यास सक्षम प्राधिकारी यांनी घालून दिलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन प्रतिवादी करतील.
आणि ज्याअर्थी, तद्नंतर आपण केलेल्या अर्जानुसार दि. २९/०८/२०२५ रोजी सकाळी ०९:०० ते १८:०० वा. दरम्यान आझाद मैदान, मुंबई येथे आपल्या मागण्यांकरीता एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी या कार्यालयाचे पत्र कमांक ७६०८/२०२५, दिनांक २७/०८/२०२५ अन्यये आपणांस देण्यात आली होती. नमूद परवानगी देताना आपणांस “जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात) नियम, २०२५” व मा. मुंबई उच्च न्यायालय यांचे उपरोक्त नमूद प्रकरणातील दि. २६/८/२०२५ रोजीचे अंतरिम आदेशाची माहिती देण्यात आली होती. तसेच तत्पूर्वी आपणास दिनांक २६/८/२०२५ रोजीचे पत्राद्वारे मा. उच्च न्यायालयाचे उपरोक्त जर अंताि चाहे “जारमा आंदोलने व मिरवणका नियम २०२७५ या नियमावलीची पत देखील देण्यात आली.
आपणास यापूर्वी आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचे आपण उल्लंघन केलेले असल्यामुळे तसेच, मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक २६/०८/२०२५ रोजीच्या त्यांच्या अंतरिम आदेशामध्ये दिलेल्या निर्देशांचे आपण उल्लंघन केलेले असल्याने, दिनांक ०१/०९/२०२५ रोजी आपण सादर केलेल्या विनंती अर्जानुसार (या पोलीस ठाण्याचे आवक क्रमांक ११३५/९/२०२५, दिनांक ०१/०९/२०२५) आपण मागितलेली आंदोलनाबाबतची परवानगी याद्वारे नाकारण्यात येत आहे. त्यानुसार आपण आझाद मैदान परिसर लवकरात लवकर रिक्त करावा.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App