विशेष प्रतिनिधी
नागपूर : Prakash Shendge आमचा सुप्रिया सुळे यांना सवाल आहे त्या जरांगेंच्या स्टेजवर गेल्याच कशाला? त्यांच्या वडिलांनी देशात पहिल्यांदा ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू करून आरक्षण दिले आणि त्याच आज जरांगेना पाठिंबा द्यायला स्टेजवर जातात? याला शरद पवारांचा पाठिंबा आहे का? असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज मनोज जरांगे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली, यावरून शेंडगे यांनी टीका केली आहे.Prakash Shendge
प्रकाश शेंडगे म्हणाले, सुप्रिया सुळे यांना कोणी दगड मारले हा आमचा प्रश्न नाही, ते सरकार आणि पोलिसांनी पहावे. जरांगे यांची कायद्याला धरून मागणी नाही, घटनेला धरून मागणी नाही. कोणीतरी म्हणते गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही आणि त्यांच्या स्टेजवर सुळे जातात. याबाबत आम्ही शरद पवारांची भेट घेणार आणि याबाबत त्यांना प्रश्न विचारणार, असे शेंडगे यांनी म्हटले आहे.Prakash Shendge
पुढे बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, मनोज जरांगे यांची मागणी कायद्याला धरुन नाही. याबाबतीत कागदपत्रे माझ्याकडे आहेत. अॅड जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केले आहे. कुणबी वेगळे आहेत, मराठा वेगळे आहेत. त्यामुळे जी मागणी केली जात आहे ती घटनेला धरुन नाही.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमलेली शिंदे समिती आणि त्यांनी दिलेला अहवाल हा बोगस असल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. ते म्हणाले, याबाबत आमची कायदेशीर लढाई सुरू आहे. 58 लाख देण्यात आलेले दाखले बोगस आहेत. मराठा समाजाची फसवणूक सुरु आहे. सर्व दाखले बाद होणार आहेत.
पुढे बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, इतिहासातील गॅझेटमध्ये नाव आहे म्हणून तो मागास आहे असे होत नाही. त्यामुळे देण्यात आलेले दाखले बोगस आणि खोटे आहेत. जर असे दाखले देणे शक्य असते तर पूर्ण देश ओबीसी झाला असता. उद्या दुपारी ३ वाजता मिटिंग आहे. आम्ही सर्व ओबीसी एकत्र येत आहोत आणि या सगळा गोष्टींच्या विरोध करणार आहोत असे शेंडगे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App