मोदींना गुंडाळायचे ट्रम्पचे प्लॅन फसले; भारताबरोबरचे संबंध बिनसले!!

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुंडाळायचे डोनाल्ड ट्रम्प यांचे प्लॅन फसले. त्यामुळे भारताबरोबरचे अमेरिकेचे संबंध बिनसले, याची कबुली अमेरिकन अधिकाऱ्याने दिल्याची बातमी न्यूयॉर्क टाइम्सने दिली. मोदींनी ट्रम्प यांचे चार फोन उचलले नाहीत, अशी बातमी जर्मन वृत्तपत्राने दिली होती त्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सने वेगळ्या बातमीचा खुलासा करून भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांच्या ताणतणावात ट्रम्प स्वतःच कसे गुंडाळले गेले, याचे अप्रत्यक्ष वर्णन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅनडा दौऱ्याच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना फोन केला होता. त्यामध्ये त्यांनी दोन प्लॅन ठरविले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबविल्याबद्दल पाकिस्तान ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी नॉमिनेट करणार होते. तसेच भारताने देखील आपल्याला त्या पुरस्कारासाठी नॉमिनेट करावे, अशी सूचना ट्रम्प यांनी मोदींना केली होती, पण मोदींनी त्या सूचनेला नकार दिला. त्या पाठोपाठ ट्रम्प यांनी दुसरा “डाव” खेळला. त्यांनी मोदींना कॅनडातून अमेरिकेत यायला सांगितले. त्याच दिवशी ट्रम्प यांनी पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर याला diplomatic lunch ला बोलावले होते. त्या diplomatic lunch च्या वेळीच मुनीर + मोदी हस्तांदोलन करायचा ट्रम्प यांचा डाव होता, पण तो डाव देखील मोदींनी वेळीच ओळखला. त्यांनी कॅनडातून अमेरिकेत जायला नकार दिला ते कॅनडातून थेट भारतात परत आले. त्यामुळे ट्रम्प यांचा दुसरा डाव देखील फसला. मोदी आणि ट्रम्प यांच्यात त्यावेळी 35 मिनिटांची बातचीत झाली, पण ट्रम्प यांच्या जाळ्यात मोदी अडकले नाहीत त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध बिनसत गेले, अशी बातमी न्यूयॉर्क टाइम्सने अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली.

ट्रम्प यांची उथळ मुत्सद्देगिरी

पण या सगळ्यातून न्यूयॉर्क टाइम्सने प्रत्यक्ष न लिहिता देखील डोनाल्ड ट्रम्प यांची मुत्सद्देगिरी किती उथळ होती, हेच सिद्ध झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचा पराभूत स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर याला diplomatic lunch दिले त्यातून त्यांनी असीम मुनीर या पराभूत पाकिस्तानी जनरलचे महत्त्व अनावश्यक वाढवून ठेवले. जे भारताला कधीच मान्य होणार नाही हे त्यांना माहिती होते तरी देखील ट्रम्प यांनी मुद्दामून मोदींना डिवचण्यासाठी मुनीर याच्याबरोबर diplomatic lunch करण्यासाठी मुलींना बोलावले. मोदी आपला प्लॅन ओळखणार नाहीत. ते आपली विनंती अस्वीकार करणार नाहीत, याची खात्री ट्रम्प न वाटत होती. पण प्रत्यक्षात मोदींनी डाव वेळीच ओळखला. ते अमेरिकेत गेले नाहीत. या सगळ्यातून ट्रम्प यांची उथळ मुत्सद्देगिरी उघड्यावर आली.

– ट्रम्प यांनाच बसल्या शिव्या

जे diplomatic lunch च्या बाबतीत घडले, तेच नोबेल पुरस्काराच्या नॉमिनेशनच्या बाबतीत घडले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सन्मानाने नोबेल पुरस्कार मिळवायच्या ऐवजी लॉबिंग सुरू केले. त्यातून खरंतर त्या पुरस्काराचे महत्त्व घटले. पाकिस्तान ट्रम्प साठी नोबेल पुरस्काराची शिफारस करणार आणि त्या पाठोपाठ भारत देखील तशीच शिफारस करणार असे ट्रम्प यांना वाटले. पण मोदींनी ट्रम्प यांचा तो डाव देखील उधळला. पण यातून ट्रम्प यांची राजनैतिक समज किती खालच्या दर्जाची आहे हे सिद्ध झाल्याशिवाय राहिले नाही. त्यानंतर खऱ्या अर्थाने टेरिफचा खेळ सुरू झाला. पण त्यातही अमेरिकन अर्थतजज्ञ आणि परराष्ट्र विषयक तज्ज्ञांकडून डोनाल्ड ट्रम्प यांना च्यु** अशाच शिव्या खाव्या लागल्या.

Trump plans failed to nail Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात