विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पण त्यापैकी एकाही वेळा मराठा आरक्षणाचे समर्थन न केलेल्या त्याचबरोबर मराठा आरक्षण न दिलेल्या शरद पवारांनी आज अचानक घुमजाव करून मराठा आरक्षणाची बाजू घेतली. पण ती घेताना सुद्धा त्यांनी आरक्षण विषयाचे घोंगडे केंद्र सरकारच्या गळ्यात घातले. तामिळनाडू सारख्या राज्यात आरक्षण वाढवून ते 72% पर्यंत पोहोचू शकते, तर ते महाराष्ट्रात का वाढू शकत नाही??, असा सवाल शरद पवार यांनी केला.
समाजाचा विकास करायचा असेल, तर तो मार्ग आरक्षणातून जातो असे काही जणांचे मत आहे. पण आरक्षणाबाबत आता केंद्र सरकारच्या पातळीवर निर्णय घेण्याची गरज आहे. घटनेत बदल करण्याची गरज आहे. जनतेची इच्छा असेल, तर तसा बदल करावा. तामिळनाडूत 72% पर्यंत आरक्षण मिळू शकते, तर महाराष्ट्रात तसे मिळायला हरकत नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी अहिल्यानगर मध्ये केले.
जरांगेंच्या मागणीवर भाष्य टाळले
पण याच शरद पवारांनी अनेकदा मराठा आरक्षणाला विरोध केला होता. शालिनीताई पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्या बरोबर त्या विषयावर वाद झाल्यानंतर पवारांनी शालिनीताईंना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरचा रस्ता दाखविला होता. ओबीसी आरक्षण कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली त्याविषयी मात्र पवारांनी मत प्रदर्शन करणे टाळले.
अहिल्यानगर जिल्ह्यात आणि परिसरात पूर्वी काँग्रेस आणि डाव्या विचारांचे वर्चस्व होते. पण आता संघ आणि भाजपचे वर्चस्व वाढत चालले आहे. हे दुर्लक्ष करण्यासारखे नाही, अशी मखलाशी देखील शरद पवारांनी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App