विशेष प्रतिनिधी
पाटणा : Rahul Gandhi बिहार विधानसभा निवडणुका जवळ येत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आणखी एक आरोप फोल ठरला आहे. त्यांनी असा दावा केला होता की गया जिल्ह्यातील निडाणी गावात एका घराच्या पत्त्यावर तब्बल ९४७ मतदार नोंदवलेले आहेत. हा आरोप सोशल मीडियावर जोरदार पसरला. मात्र, प्रत्यक्ष गावकऱ्यांनी आणि निवडणूक आयोगानेच त्यांचा दावा खोडून काढत सांगितले की हा आरोप दिशाभूल करणारा आहे.Rahul Gandhi
गया जिल्हाधिकारी व बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले की अनेक ग्रामीण भागांत घर क्रमांकच नसतात. अशा ठिकाणी मतदार यादीत प्रतीकात्मक किंवा नाममात्र घर क्रमांक वापरला जातो. त्यामुळे “९४७ मतदार एकाच घरात राहतात” हा आरोप चुकीचा ठरतो.Rahul Gandhi
जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या व्हिडिओत गावकऱ्यांनीही सांगितले की ते १९८७ पासून मतदान करत आहेत आणि मतदार यादीत कोणत्याही प्रकारचा फेरफार नाही. निवडणूक आयोगाची विशेष गहन पुनरिक्षण (SIR) मोहीम समाधानकारकपणे पार पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
याआधीही राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप केले होते. त्यावेळीही आयोगाने हे आरोप फोल ठरवत स्पष्ट केले होते की “घर क्रमांक 0” ही पद्धत बेघर किंवा घर क्रमांक नसलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आहे.
बिहारमध्ये मात्र गावकऱ्यांनीच राहुल गांधींचा दावा फेटाळून लावल्याने ते पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App