Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

Maratha reservation

विशेष प्रतिनिधी

 

मुंबई : Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी मुंबईच्या वेशीवर ठाण मांडले आहे. राज्याच्या विविध भागांतून आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने शहरात प्रचंड वाहतूक कोंडी आणि गर्दी निर्माण झाली आहे. या आंदोलनामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे सांगत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

लोकशाही मार्गाने आंदोलनाला पूर्ण पाठिंबा

फडणवीस यांनी सांगितले की, “लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना सरकारचे पूर्ण सहकार्य असेल. गेल्या दहा वर्षांत आमच्या सरकारनेच मराठा समाजाला न्याय दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम आम्ही केले, तर इतर सरकारांनी केवळ राजकारण केले.” विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले, “काही लोक या आंदोलनाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचे तोंडच भाजले जाईल!”

ठाकरे-पवारांवर टीकास्त्र

फडणवीस यांनी ठाकरे आणि पवार यांच्यावर मराठा आणि ओबीसी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. “काही पक्ष सोयीस्कर भूमिका घेत आहेत. ते आंदोलनाला थेट पाठिंबा देत नाहीत आणि विरोधही करत नाहीत. अशा दुटप्पी भूमिकेमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो,” असे ते म्हणाले.


सरकारची सहकार्याची भूमिका

आंदोलनामुळे मुंबईत निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीबाबत फडणवीस यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “आंदोलकांनी असे वर्तन करू नये की ज्यामुळे संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागेल. प्रशासन न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करेल. मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे, यावर सरकार सकारात्मक विचार करत आहे.”

उच्चस्तरीय समितीची स्थापना

मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. फडणवीस यांनी सांगितले की, “ही समिती अधिकारसंपन्न आहे आणि तिचा निर्णय हा मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जाईल. आम्ही मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

सामाजिक सलोख्याचे आवाहन

फडणवीस यांनी मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहू नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. “काही लोक जाणीवपूर्वक दोन समाजांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहोत आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले.

Tension in Mumbai over Maratha reservation, Fadnavis attacks opponents!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात