विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत विविध विषयांवर भाष्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेले 50 टक्के टॅरिफ आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “श्रीगणेशाने दोन्ही भावांना सुबुद्धी दिली आहे. त्यांनी कायम एकत्र राहावे, अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो,” असे फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर भारत ट्रम्प यांच्या टॅरिफला नक्कीच तोंड देईल आणि या आव्हानाला संधीमध्ये बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.CM Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. त्यांनी सहकुटुंब विधिवत गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी बाप्पाकडे राज्यातील जनतेला सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य मिळो अशी प्रार्थना केली. श्री गणेश आपले आराध्य दैवत आहेत. ते आपले विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर, राज्यावर येणारे सर्व विघ्न हरावेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरिता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद द्यावेत, अशी प्रार्थना विघ्नहर्ताच्या चरणी करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.CM Fadnavis
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारची तयारी काय?
राज्य उत्सवाचा दर्जा दिल्यानंतर यंदा पहिला गणेशोत्सव होत आहे. यावर्षी जास्त गर्दीही अनेक ठिकाणी दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाची तयारी कशी असणार आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, सध्या गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. नियोजनासंदर्भात त्या-त्या ठिकाणची पोलिस युनिट्स आहेत. मंडळांसोबत SOP पाळण्याविषयी चर्चा केली आहे. मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणता लोक येतात, त्याचा विचार करता, मोठ्याप्रमाणात काळजी घेतली आहे. ”
ठाकरे बंधूंना एकत्र राहण्याची सुबुद्धी देवो
गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताना दिसले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. “मला असे वाटते की श्रीगणेशाने सुबुद्धी दिली आहे. त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्रित आले आहेत. ते दोन्ही भाऊ एकत्रित राहावेत. दोन्ही भावांना अशीच सुबुद्धी मिळत राहावी अशी श्रीगणेशाच्या चरणी मी प्रार्थना करतो”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आत्मनिर्भर भारत आणि अमेरिकेच्या टॅरिफवर भाष्य
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५०% टॅरिफवरही मुख्यमंत्र्यांनी आपले मत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनाला जनतेने जनआंदोलन म्हणून स्वीकारले आहे. जेव्हा एक मार्ग बंद होतो, तेव्हा दुसरे मार्ग उघडतात आणि आम्ही या आव्हानाला संधीमध्ये बदलू, असे त्यांनी सांगितले.
तसेच, या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने “वॉर रुम” सुरू केली आहे. या वॉर रुमचा उद्देश वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये व्यापार वाढवणे आणि जागतिक स्पर्धेसाठी आवश्यक सुधारणा करणे आहे. यासाठी १०० सुधारणा करण्याचे लक्ष्य ठेवले असून, उत्पादन खर्च कमी करून नवीन बाजारपेठा मिळवण्यावर भर दिला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App