नाशिक : मराठा आरक्षणाचे आंदोलन करताना मनोज जरांगे श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात काही बोलत नाहीत. तेच मराठा आरक्षणातले खरे अडथळा आहेत. ओबीसी समाजाने जरांगे यांच्या जाळ्यात अडकू नये, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची पोलखोल केली होती. आज मराठा आंदोलनातले तेच सत्य स्वतः मनोज जरांगे यांच्या तोंडून बाहेर आले. आम्हाला श्रीमंत मराठ्यांच्या साथीची गरज आहे. श्रीमंत मराठ्यांनी सगळ्या मराठ्यांच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटीतून बाहेर पडताना केले.
एकीकडे शरद पवार मंडल यात्रा काढून ओबीसी समाजाला गंडवत आहेत, तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलन पुन्हा उभे केले आहे. यातली गेम ओबीसी समाजाने समजून घ्यावी. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे श्रीमंत मराठेच होते. पण त्यांना जरांगे काही बोलत नव्हते. महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार हे श्रीमंत मराठे आहेत. पण त्यांना जरांगे काही बोलत नाहीत. हा डाव गरीब मराठ्यांनी ओळखावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
श्रीमंत मराठ्यांची बाजू उचलून धरली
मनोज जरांगे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर कुठली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, पण तरी देखील त्यांच्या तोंडून मराठा आंदोलनातले राजकीय सत्यच बाहेर यायचे थांबले नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे नेतृत्व चांगले आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना बोलू देत नाहीत, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी चांगले काम केले, पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुढे काम करू दिले नाही. अजित पवारांचे हे नेतृत्व चांगले आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
– सत्य expose
पण त्याचवेळी जरांगे यांनी श्रीमंत मराठ्यांची बाजू उचलून धरली. मराठा आरक्षण आंदोलनासाठी श्रीमंत मराठ्यांची आम्हाला गरज आहे. सत्ताधारी पक्षातल्या आणि विरोधी पक्षातल्या श्रीमंत मराठ्यांनी सगळ्या मराठा समाजाच्या बाजूने उभे राहावे. त्यांनी आंदोलनासाठी सगळी मदत करावी. गाड्या घोडे द्यावेत, असे आवाहन जरांगे यांनी श्रीमंत मराठ्यांना केले. प्रकाश आंबेडकर नेमके श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा याच भाषेत बोलत होते, ती भाषा नकळतपणे मनोज जरांगे यांनी वापरून मराठा आरक्षण आंदोलनातले सत्य expose केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App