नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातल्या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लागोपाठ दुसरा धक्का दिला.
अजित पवार यांचा विरोध मोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला मदत केली. राजगड सहकारी साखर कारखान्याच्या 467 कोटी रुपयांच्या कर्जाला फडणवीस सरकारने हमी दिली. बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या कर्जाला सरकारने हमी का द्यायची??, असा सवाल करून अजित पवारांनी थोपटेंच्या साखर कारखान्याला मदत करायला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध केला. परंतु, यापूर्वी अनेक कारखान्यांच्या कर्जांना सरकारने हमी दिली आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचा विरोध मोडून काढला. राजगड सहकारी कारखान्याच्या कर्जाच्या हमीला विरोध करण्याच्याविरोध करण्याच्या निमित्ताने पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या अजित पवारांच्या प्रयत्नांना देवेंद्र फडणवीस यांनी धक्का दिला.
पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये थोपटे आणि पवार या दोन घराण्यांचे कधी पटले नाही. पण सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी शरद पवारांना अनंतराव थोपटे यांच्या घराची पायरी चढावी लागली होती. पवारांनी अनंतरावांना केलेली विनंती थोपटे घराण्याने मानली होती. सुप्रिया सुळे यांना मदत केली होती. याचा राग मनात धरून अजित पवारांनी संग्राम थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्याच्या कर्जाला हमी द्यायला विरोध केला होता.
पण दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार शंकर मांडेकर यांनी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या संग्राम थोपटे यांचा भोर मतदारसंघात पराभव केला होता. या पराभवानंतर संग्राम थोपटे यांनी भविष्यकालीन राजकारणाचा विचार करत भाजपमध्ये प्रवेश केला. ते मुख्यमंत्र्यांच्या छत्रछायेखाली आले. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यकालीन विचार करत संग्राम थोपटे यांना बळ दिले. त्यांच्या मागणीनुसार राजगड सहकारी साखर कारखान्याच्या 467 कोटी रुपयांच्या कर्जाला राज्य सरकारची हमी मिळवून दिली. पुणे जिल्ह्यातली अजितदादांची दादागिरी मुख्यमंत्र्यांनी भोर तालुक्यात मोडून काढली.
– प्रभाग रचनेतली दादागिरी मोडली
याआधी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक करून ठेवलेली दादागिरी मोडून काढण्यात मुख्यमंत्री फडणवीसांना यश आले. पुणे शहराच्या ग्रामीण प्रभागांच्या संख्येत वाढ करून नगरसेवक वाढवून ठेवायचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा डाव होता. परंतु, ग्रामीण प्रभागांची संख्या मर्यादित ठेवण्यात मुख्यमंत्री फडणवीस यशस्वी झाले. जे पुण्याच्या बाबतीत घडले तेच पिंपरी चिंचवडच्या बाबतीत त्यांनी घडवून आणले. सगळीच प्रभाग रचना आपल्या मनासारखी होत नाही, याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांना द्यावी लागली. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढावी लागली. त्यानंतर भोर तालुक्यामधल्या कारखान्याला मदत करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजितदादांची पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातली अजितदादांची दादागिरी मोडून काढली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App