चेंगट व्यापारी ते असीम मुनीरची अमेरिकन आवृत्ती!!, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय प्रवास झालेला दिसतोय. तो “अत्यंत वेगवान” आहे. अमेरिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत एवढा वेगवान राजकीय प्रवास केलेला राष्ट्राध्यक्ष सापडणे कठीण आहे. Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी जे “वेगवान” निर्णय घेतले आणि ते निर्णय घेण्यापूर्वी जी अतिरेकी भाषणे केली, त्यातून सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पठाडीबाज अध्यक्ष नाहीत. अमेरिकन आणि जागतिक पातळीवर रुजलेली diplomatic language and practice ते आणि त्यांचे निकटचे सहकारी मानत नाहीत आणि करीतही नाहीत. ते हेन्री किसिंजर यांच्यासारखे Republican hardliner नाहीत. ते पूर्णपणे व्यापारी वृत्तीचे आहेत. ते जगातला सगळा व्यवहार, अगदी युद्ध सुद्धा फक्त व्यापारी वृत्तीतूनच पाहतात. अमेरिकेचे हित फक्त व्यापारी वृत्तीतून साधायचा त्यांचा इरादा आहे वगैरे विश्लेषण ट्रम्प समर्थकांनी केले होते. त्याचे वेगवेगळे पैलू मांडले होते. ट्रम्प टेरिफचे समर्थन करताना त्यांनी चीन, भारत आणि रशिया यांना लागू होत नसलेली सगळी दूषणे दिली होती.
त्याचवेळी ट्रम्प यांची नोबेल पुरस्कार मिळवायची महत्त्वाकांक्षा जागृत झाली आणि त्यांनी जगातल्या युद्धांमध्ये हस्तक्षेप केल्याचा दावा करत नोबेल पुरस्कारावर दावा ठोकला. पण तो ठोकताना सुद्धा ट्रम्प यांनी व्यापार सवलती आणि टेरिफची धमकी हीच दोन हत्यारे वापरली.
चीनला उद्ध्वस्त करायची भाषा
पण गेल्या काही दिवसांमधली ट्रम्प यांची भाषा अधिक कडवट आणि diplomatic वर्तुळाच्या “अतिबाहेरची” झाली आहे. ते पाहता ट्रम्प हे चेंगट व्यापारी ते असीम मुनीरची अमेरिकन आवृत्ती इथपर्यंत येऊन ठेपले आहेत, असेच दिसून आले. ट्रम्प हे व्यापारी आहेत, इथपर्यंत ठीक आहे. त्यांना rutine diplomatic भाषा समजत नाही. ते ती वापरत नाहीत, इथपर्यंत देखील ठीक आहे, पण व्यापारी सुद्धा घासागिस करताना एवढे ताणून धरत नाही की सगळ्या व्यापारच तुटेल. उलट तो देवाणघेवाणीत “दोन इकडे – दोन तिकडे” असे करून आपले व्यापारी हित साधून घेतो. पण डोनाल्ड ट्रम्प आता तसे करायच्या मूडमध्येच दिसत नाहीत. म्हणून तर त्यांनी भारतावर 25 % टेरिफ लादायच्या नोटीस वर स्वाक्षरी केली आणि त्याचवेळी त्यांनी आपण चीनला उद्ध्वस्त करू शकतो, अशी धमकी दिली. अमेरिकेकडे अशी काही कार्ड्स आहेत, की ती जर खेळली, तर चीन उध्वस्त होऊ शकतो म्हणून मी ती कार्ड्स खेळणार नाही. मी चीनबरोबर चांगले संबंध राखू इच्छितो, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले.
– असीम मुनीरची कॉपी
ही पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर याच्याच दमदाटीची पुनरावृत्ती ठरली. असीम मुनीर याने अमेरिकेत जाऊन त्यांच्या भूमीवरून निम्म्या जगाला उद्ध्वस्त करायची धमकी दिली होती. पाकिस्तानवर कुठलेही संकट आले तर पाकिस्तान कडे एवढी अण्वस्त्रे निश्चित आहेत की पाकिस्तान बुडताना निम्म्या जगाला घेऊन बुडेल, असे अतिरेकी वक्तव्य असीम मुनीर याने केले होते. असीम मुनीरची निम्मे जग बुडवायची भाषा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची चीन उद्ध्वस्त करायची भाषा समान दर्जाचीच ठरली. ट्रम्प फक्त असीम मुनीरची नष्टप्राय भाषा वापरून थांबले नाहीत. त्या पुढे जाऊन त्यांनी diplomatic वर्तुळाबाहेरची वक्तव्ये केली. अमेरिका म्हणजे पिगी बँक नाही. जगाची डोअर मॅट नाही. भारत पाकिस्तान युद्धात 7 जेट्स पाडली. अमेरिकेच्या अटी पाळा नाहीतर परिणामांना तयार राहा, अशी दमदाटी त्यांनी केली.
आत्तापर्यंत पाकिस्तानचे राज्यकर्ते अमेरिकन राज्यकर्त्यांना follow करत असायचे, पण आता अमेरिकेतली मिसीसीपी नदी उलटी वाहायला लागली. अमेरिकेचा अध्यक्ष पाकिस्तानी राज्यकर्त्याला follow करायला लागला हेच यातून दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App